संग्रामपूर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या

Located in the courtyard of the Sangrampur tehsildar
Located in the courtyard of the Sangrampur tehsildar

बुलडाणा : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांची चुकीची नावे दुरुस्त करून या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवा, अशी मागणी करीत गुरुवारी (ता. ९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांसह संग्रामपूर (जि. बुलडाणा) तहसीलदारांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. 

ही योजना जिल्हा पातळीवर चुकांच्या गराळ्यात पडल्याने योजनेचा फज्जा उडत आहे. आधार कार्डाशी या नावांचा मेळ बसत नसल्याने ही नावे दुरुस्त करावयाची आहेत. मात्र, ही दुरुस्तीची कार्यवाही ग्रामीण भागात अजूनही झालेली नाही. तलाठ्यांच्या उदासीनतेमुळे व अनेक शेतकऱ्यांचे जिल्हा पातळीवर प्रलंबित दाखवत आहेत. या संदर्भातील नावांची दुरुस्ती, आधार बाबतची खात्री करून घ्यावयाची होती.

साधारणत: ७० टक्के शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. पोर्टलवर नाव दुरुस्तीसाठी ३१ डिसेंबर शेवटची मुदत होती. त्या अगोदर याद्या दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या संदर्भात केंद्र सरकारने पोर्टलवर दुरुस्तीसंबंधी शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांकडे पाठविली होती. 

शेतकरी सन्मान निधीबाबत सरकार निधी पाठवत आहे. स्थानिक स्तरावर प्रशासन याबाबत जागरूकपणे शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोचविण्यासाठी काम करीत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल ५० टक्के शेतकरी या निधीच्या लाभापासून वंचित आहेत.

सोगोडा (ता. संग्रामपूर) येथील शेकडो शेतकऱ्यांना एक दमडीही न मिळाल्याने या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. अशी अनेक गावे बेवारस असल्याने लाभापासून शेतकरी वंचित राहत आहेत. 

या संदर्भात सोगोडा गावाचा तात्काळ विचार करून तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार डी. एल. मुकूंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे पाच दिवसांत दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले. 

या आंदोलनामधे रोशन देशमुख, गोकुळ गावंडे, विठ्ठल महाले, प्रदीप मेतकर, संजय अवचार, संजय बोरोकार, सिद्दीक कुरेशी, संजय माळी, सागर हागे, विजय मेतकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com