कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी सोसायट्यांना ठोकले टाळे !

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी सोसायट्यांना ठोकले टाळे !
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी सोसायट्यांना ठोकले टाळे !

सागाव, जि. सांगली : कणदूर (ता. शिराळा) येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफी न मिळाल्यामूळे कणदूर ग्रूप व जोतिर्लिंग सेवासोसायटी या दोन सेवा सोसायट्यांना सोमवारी (ता. ३०)  टाळे ठोकले.  महाविकास आघाडी सरकारने थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे . परंतु वेळेवर कर्ज परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा कधी होणार? शेतकरी दरवर्षी सेवासोसायटी व बॅंकेतून पीककर्ज घेऊन शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, मशागत व इतर कामे करत आसतात. ऊसाचे पीक कारखान्यास दिल्यानंतर त्याचे बिल पहिल्यांदा पीक कर्ज सोसायट्या व बॅंका मार्च अगोदर कट करून घेतात आणि राहिलेले पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाते. त्यामुळे कोणताही शेतकरी कर्ज थकबाकीदार राहत नाही.  प्रारंभी सोसायटीचे सचिव पांडुरंग ढोले यांना निवेदन देण्यात आले. कणदूर मधील शेतकऱ्यांनी आमच्या ऊसबिलातून कोणत्याही कर्जापोटी पैसे न घेता थेट बॅंक खात्यावर जमा झाले पाहिजे. आम्ही कर्ज घेतोय ते कसे फेडावयाचे आमचे आम्ही बघून घेऊ. सरकारही कर्ज बुडवणाऱ्यांना आगोदर माफ करत आहे आणि वेळेवर भरणाऱ्यांना नंतर विचार करून देऊ म्हणत आहे. या पुढे आमच्या पिकांची बिले कटिंग न करता आमच्या बॅंक खात्यावर जमा झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी कणदूर ग्रुप सेवा सोसायटी व जोतिर्लिंग सेवासोसायटी यांना टाळे ठोकले.  या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, विलास पाटील, गुंगा पाटील, वसंत पाटील, दत्तात्रय पाटील, बाबूराव पाटील, शिवाजी पाटील, राम पाटील, संपत पाटील, सर्जेराव पाटील, भगवान पाटील असे शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com