Agriculture news in marathi The 'lockdown' caused the flowers in the Mangrul to fade into the tree itself | Agrowon

‘लॅाकडाउन’मुळे मंगरूळ येथील फुले झाडावरच कोमेजली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

जरबेराचा यंदाचा हा पहिलाच हंगाम आहे. चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळत होते. परंतु लॅाकडाऊनमुळे दररोजचे तीन ते चार हजार रुपयांचे उत्पन्न बंद झाले आहे. 
- ज्ञानेश्वर देशमाने, शेतकरी, मंगरुळ, ता. मानवत, जि.परभणी. 
........... 
दररोज सातश ७०० ते ८०० जरबेरा फुले तोडून फेकून द्यावी लागत आहेत. मजुरी, निविष्ठावर मोठा खर्च होत आहे. 
- मोहन कापसे, शेतकरी मंगरुळ, ता. मानवत, जि. परभणी. 
 

परभणी : ‘लॅाकडाउन’मुळे मंगरुळ (ता. मानवत) येथील जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विक्री बंद असल्यामुळे फुले झाडांवरच कोमेजली आहेत. दररोज महागडी फुले तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दररोजचे तीन ते चार हजार रुयांचे उत्पन्न बुडत आहे. परंतु, शेतातील जरबेराच्या व्यवस्थानावर खर्च होत आहे. त्यामुळे आठ जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला पहिल्याच हंगामात खीळ बसली आहे. 

मंगरुळ येथील ज्ञानेश्वर देशमाने, मीनाक्षी कापसे, माणिक साखरे, नागनाथ रोडगे, दादाराव देशमाने, हनुमंत पेदापल्लीकर, पद्माबाई डुकरे, देविदास कदम या आठ शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला.

गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पॉलीहाऊसमध्ये प्रत्येकी दहा गुंठे क्षेत्रावर जरबेराची लागवड केली. जानेवारीत जरबेराचा काढणी हंगाम सुरु झाला. पुणे येथील मार्केटमध्ये विक्रीतून प्रत्येक शेतकऱ्यास दररोज तीन ते चार हजार रुपयाचे उत्पन्न मिळत होते. जेमतेम एक ते दोन महिने चांगले उत्पन्न मिळाले. 

दरम्यान, लॉकडाउनमुळे वाहतुक तसेच फुलांचे मार्केट बंद आहे. लग्न समारंभ, धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे जरबेराच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. काढणीला आलेली फुले दररोज फेकून द्यावी लागत आहेत. जरबेरा पिकांच्या व्यवस्थापनासाठी किडकनाशके, खते तसेच मजुरी यावर खर्च होत आहे. उत्पन्न बंद झाले, परंतु खर्च सुरुच आहे. त्यामुळे उत्पादकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे नुकसानीत अधिकच भर पडत आहे. गेल्या २० दिवसांत लाखो रुपयाचे उत्पन्न बुडल्याने उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...