लॉकडाउन महिन्याभरासाठी वाढविला; मात्र ‘मॉल’, व्यापारी संकुले उघडणार

महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. लॉकडाउन वाढवण्यास घटक पक्षांचा विरोध असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्याची भूमिका कायम ठेवली.
लॉकडाउन महिन्याभरासाठी वाढविला; मात्र ‘मॉल’, व्यापारी संकुले उघडणार
लॉकडाउन महिन्याभरासाठी वाढविला; मात्र ‘मॉल’, व्यापारी संकुले उघडणार

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. लॉकडाउन वाढवण्यास घटक पक्षांचा विरोध असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्याची भूमिका कायम ठेवली. लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार जुन्या मार्गदर्शक तत्त्वांत बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र मॉल आणि मार्केट कॉम्पेल्क्स पाच ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल आणि व्यापारी संकुलातील चित्रपटगृहे, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरू ठेवण्यास मात्र परवानगी नाही. परंतु, होम डिलिव्हरीसाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपले किचन सुरू ठेऊ शकतील.

पाच ऑगस्टपासून हे सुरू होणार

  • माॉल व मार्केट कॉम्प्लेक्स (सकाळी ९ ते सायं. ७)
  • आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखांब
  • दुचाकीवर दोघांना प्रवासास परवानगी
  • टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ यांना परवानगी. मात्र मास्क अनिवार्य
  • आधी मंजूरी दिलेली दुकाने
  • ई-कॉमर्स
  • सध्या सुरु असलेली सर्व इंडस्ट्रियल युनिट
  • शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अत्यावश्यक सेवा सोडून अन्य विभाग १५ टक्के कर्मचाऱ्यांनिशी काम करतील.
  • खासगी व्यवस्थापनात १० टक्के किंवा १० कर्मचारी यातील जे कमी असेल त्यानुसार परवानगी
  • मद्य दुकाने (आधी परवानगी दिल्यानुसार)
  • लग्न समारंभ (जास्तीत जास्त ५० जणांच्या उपस्थितीसह)
  • बांधकामे
  • खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी
  • पूर्वनियोजित वेळ घेऊन वाहनदुरुस्तीसाठी गॅरेज
  • वर्तमानपत्रांची छपाई व वितरण
  • केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर २५ जूनच्या आदेशानुसार
  • हे बंदच राहणार

  • पोहण्याचे तलाव
  • मोठ्या सभा-समारंभ
  • आंतरजिल्हा बस सेवा
  • शाळा, महाविद्यालये 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com