कोमजलेली फुले अन्‌ हिरमुसलेले शेतकरी

सध्या मंदिर, लग्नसोहळे, कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. बाजारात फुलांची आवक होत असली, तरी मागणी थंडावलेली आहे. फुलांना मागणी नसल्याने शेतात फुललेली फुले कोमेजली अन् शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसलेले आहेत.
कोमजलेली फुले अन्‌ हिरमुसलेले शेतकरी
कोमजलेली फुले अन्‌ हिरमुसलेले शेतकरी

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घाम गाळून शेतात उत्पादित झालेली फुले फेकून द्यावी लागत असल्याने डोळे पाणावतात... काय करणार... नशिबच फुटके... अशी व्यथा फूल उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या मंदिर, लग्नसोहळे, कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. बाजारात फुलांची आवक होत असली, तरी मागणी थंडावलेली आहे. फुलांना मागणी नसल्याने शेतात फुललेली फुले कोमेजली अन् शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसलेले आहेत.  शेतात फुलांचे ताटवे फुलले आहेत. मात्र कोरोनामुळे शेतीतील फुलांचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असल्याने अनेकांनी बाजारात न्यायला परवडत नाही. झाडावर तशीच ठेवली, तर झाड खंगते. तोडाईचे नुकसान झेलून त्यांनी चक्क फुले शेतातच फेकल्याचे हेमंत सावकार या शेतकऱ्यांनी सांगितले.  नागपूरच्या मार्केटमध्ये गुलाब, लिली, शेवंती, कलर, डेझी ही फुले मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांचा यात समावेश अधिक असतो. फुले नाशिवंत असल्याने तोड झाल्याबरोबर तत्काळ विक्रीला आणावी लागतात, अन्यथा मातीमोल होतात. गेल्या आठवड्यात टाळेबंदीमुळे बाजारपेठा बंद होती. त्यामुळे शेतातील माल शेतातच फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे लाखो रुपयांची फुले मातीमोल झालेली आहेत.  गेल्या वर्षीपासूनच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फूल उत्पादक मेटाकुटीला आलेला आहे. फुलाला मागणी नसल्याने विक्रीसाठी आणलेला अर्धापेक्षा अधिक माल फेकून द्यावा लागतो आहे. तोडाईचे पैसेही निघत नसल्याने झाडावरील फुले तोडणे बंद केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  दीड टक्क्यावर उलाढाल मंदिरे बंद असल्याने दुकाने बंद आहेत. सर्वाधिक मागणी या विक्रेत्यांचीच असते. याशिवाय लग्नसोहळेही बंद झालेले असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवरही बंदी आली आहे. त्याचा फटकाही फूल उत्पादकांसह विक्रेत्यांना बसू लागला आहे. शहरातील फुलांच्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांकडून दररोज सरासरी सात ते दहा लाख रुपयांची उलाढाल होते, सध्या ही उलाढाल फक्त १० ते १२ हजार रुपयांवर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बाजारात फुले आणू नका असे निरोप दिले आहेत. तरीही काही शेतकऱ्यांनी बाजारात फुले विक्रीसाठी आणली ते प्रमाण फक्त दहा टक्के आहे. तेवढ्या फुलांची विक्री होत नसल्याने उलाढालही फक्त १० ते १२ हजार रुपयांवर आली आहे. - जयंत रणनवरे, अध्यक्ष,  महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशन शेतात कलर आणि गुलाबाची फुले लावली. दोन एकर पैकी फक्त एकाच एकरमधील गुलाबाची तोड करीत असलो तरी विक्रीही होत नसल्याने फुले फेकून द्यावी लागत आहेत. - निखिल यादव,  फूल उत्पादक शेतकरी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com