agriculture news in marathi Lockdown increased till two weeks in country from fourth may | Agrowon

देशभरातील लाॅकडाऊन १७ मे पर्यंत वाढविला : `रेड झोन`साठी सवलत नाहीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला आहे. ४ मेपासून त्याची अंमलबजावणी होणार असून १७ मेपर्यंत लॉकडाऊन असेल.

पुणे :  केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला आहे. ४ मेपासून त्याची अंमलबजावणी होणार असून १७ मेपर्यंत लॉकडाऊन असेल. केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे.

प्रत्येक लाॅक डाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी देशाला संबोधून भाषण केले होते. तिसऱ्या  लाॅकडाऊनची घोषणा मोदींनी न करता एका नोटिफिकेशऩद्वारे करण्यात आली. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.

 • ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
 • ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही.
 • रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे.
 • जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते आॅरेंजमध्ये गृहित धरले जातील.

झोन दर आठवड्याला निश्चित केले जातील. राज्यांना रेड किंवा आॅरेंज झोनमध्ये जिल्हे समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. गेल्या चोवीस तासांत देशांतील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे. राज्यातील एकूण 14 जिल्हे तर देशातील 120 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 

राज्यनिहाय रेडझोन जिल्ह्यांची संख्या

 • उत्तरप्रदेश... १९
 • महाराष्ट्र... १४
 • तामिळनाडू.. १२
 • दिल्ली... १२
 • पश्चिम बंगाल..१०

सर्वाधिक ग्रीन झोन जिल्हे

 • आसाम... ३०
 • अरुणाचल प्रदेश..२५
 • छत्तीसगड...२५
 • मध्यप्रदेश..२४
 • ओडिशा..२१
 • उत्तरप्रदेश..२० 

महाराष्ट्रातील जिल्हे

 • रेडझोन : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर , सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, सातारा, धुळे, अकोला आणि जळगाव.
 • ऑरेंज झोन : नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, बीड भंडारा , लातूर, सांगली , परभणी, रायगड, हिंगोली, रत्नागिरी, जालना.
 • ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा.

इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...