Lockdown reduces fund production by 71.59 tonnes
Lockdown reduces fund production by 71.59 tonnes

लॉकडाउमुळे कोष उत्पादनात ७१.५९ टनांची घट 

परभणी जिल्ह्यात १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये उत्पादन बंद राहिल्याने या दोन जिल्ह्यांतील कोष उत्पादनात अनुक्रमे ४०.७ टन आणि ३०.५९ टन एवढी घट झाली आहे.

परभणी/हिंगोली ः सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये उत्पादन बंद राहिल्याने या दोन जिल्ह्यांतील कोष उत्पादनात अनुक्रमे ४०.७ टन आणि ३०.५९ टन एवढी घट झाली आहे. 

पारंपरिक पीक पद्धतीतून विविध कारणांनी उत्पादन आणि उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. परंतु रेशीम शेतीच्या माध्यमातून खात्रीशीर उत्पन्न मिळत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आदी योजनेअंतर्गत अनुदान दिले जात असल्याने या दोन जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. 

परभणी जिल्ह्यात परभणी, सेलू, पूर्णा हे चार रेशीम क्लस्टर आहेत. जुनी ७३३ एकर आणि नवीन २०४ एकर मिळून एकूण ९३७ एकरवर तुती लागवड आहे. सन २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी बायव्होल्टाइन जातीच्या रेशीम कीटकाच्या २ लाख १६ अंडीपुंजापासून १२६.८० टन कोष उत्पादन घेतले. यावर्षी महारेशीम अभियान अंतर्गत २२५ एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ५८५ शेतकऱ्यांनी ५८५ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, पर्यवेक्षक पी. बी. नरवाडे यांनी दिली. 

हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन उत्पादन  हिंगोली जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये १३८ शेतकऱ्यांनी १३८ एकर नवीन तुती लागवड केली. एकूण ३०४ शेतकऱ्यांकडे ३१८ एकरांवर जुनी तुती लागवड आहे. जिल्ह्यात जुनी, नवीन मिळून एकूण ४४२ शेतकऱ्यांकडे ४५६ एकरांवर तुती लागवड आहे. परंतु सन २०२०-२१ मध्ये २४९ शेतकऱ्यांनी २६० एकरांवरील तुतीवर ८५ हजार ४०० अंडीपुंजापासून ४४.४१० टन उत्पादन घेतले. यंदा महारेशीम अभियानांतर्गत ३२५ शेतकऱ्यांनी ३२५ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे, पर्यवेक्षक अशोक वडवाले यांनी दिली. 

मार्केट बंदमुळे फटका  गतवर्षी परभणी जिल्ह्यात १६७.५० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ७५ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले होते. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये रेशीम कोष मार्केट बंद राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत कोष उत्पादन घेतले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोष उत्पादनात घट आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com