Agriculture news in marathi Lockdown reduces fund production by 71.59 tonnes | Agrowon

लॉकडाउमुळे कोष उत्पादनात ७१.५९ टनांची घट 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

परभणी जिल्ह्यात १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये उत्पादन बंद राहिल्याने या दोन जिल्ह्यांतील कोष उत्पादनात अनुक्रमे ४०.७ टन आणि ३०.५९ टन एवढी घट झाली आहे. 

परभणी/हिंगोली ः सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये उत्पादन बंद राहिल्याने या दोन जिल्ह्यांतील कोष उत्पादनात अनुक्रमे ४०.७ टन आणि ३०.५९ टन एवढी घट झाली आहे. 

पारंपरिक पीक पद्धतीतून विविध कारणांनी उत्पादन आणि उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. परंतु रेशीम शेतीच्या माध्यमातून खात्रीशीर उत्पन्न मिळत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आदी योजनेअंतर्गत अनुदान दिले जात असल्याने या दोन जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. 

परभणी जिल्ह्यात परभणी, सेलू, पूर्णा हे चार रेशीम क्लस्टर आहेत. जुनी ७३३ एकर आणि नवीन २०४ एकर मिळून एकूण ९३७ एकरवर तुती लागवड आहे. सन २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी बायव्होल्टाइन जातीच्या रेशीम कीटकाच्या २ लाख १६ अंडीपुंजापासून १२६.८० टन कोष उत्पादन घेतले. यावर्षी महारेशीम अभियान अंतर्गत २२५ एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ५८५ शेतकऱ्यांनी ५८५ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, पर्यवेक्षक पी. बी. नरवाडे यांनी दिली. 

हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन उत्पादन 
हिंगोली जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये १३८ शेतकऱ्यांनी १३८ एकर नवीन तुती लागवड केली. एकूण ३०४ शेतकऱ्यांकडे ३१८ एकरांवर जुनी तुती लागवड आहे. जिल्ह्यात जुनी, नवीन मिळून एकूण ४४२ शेतकऱ्यांकडे ४५६ एकरांवर तुती लागवड आहे. परंतु सन २०२०-२१ मध्ये २४९ शेतकऱ्यांनी २६० एकरांवरील तुतीवर ८५ हजार ४०० अंडीपुंजापासून ४४.४१० टन उत्पादन घेतले. यंदा महारेशीम अभियानांतर्गत ३२५ शेतकऱ्यांनी ३२५ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे, पर्यवेक्षक अशोक वडवाले यांनी दिली. 

मार्केट बंदमुळे फटका 
गतवर्षी परभणी जिल्ह्यात १६७.५० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ७५ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले होते. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये रेशीम कोष मार्केट बंद राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत कोष उत्पादन घेतले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोष उत्पादनात घट आली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...