सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदी

राज्यात सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार शुक्रवारी (ता. ९) रात्री आठ ते ते सोमवारी (ता. १२) सकाळी ७ पर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण टाळेबंदी असणार आहे.
सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदी
सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदी

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे करावयाची खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार शुक्रवारी (ता. ९) रात्री आठ ते ते सोमवारी (ता. १२) सकाळी ७ पर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण टाळेबंदी असणार आहे.  राज्यात कोरोना फैलावाचा वेग चिंताजनक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक रविवारी (ता.४) बोलविली होती. यात हा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आज (सोमवारी) जाहीर केल्या जाणार आहेत. या बैठकीत टाळेबंदीबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. असे असतील निर्बंध... 

  •     पहिल्या टप्प्यात हा निर्णय ३० एप्रिलपर्यंत असेल. 
  •     शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक टाळेबंदी 
  •     इतर दिवशी रात्रीची संचारबंदी
  •     व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, बागा, उपहारगृहे बंद राहणार
  •     बसमध्ये केवळ बसून प्रवासाला परवानगी.
  •     सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
  •     चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी, मात्र गर्दीवर निर्बंध
  •     सर्व प्रकारच्या कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना.
  •     मंत्रालय, महत्त्वाचे ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींच्या भेटींना बंदी.
  •     अंदाज घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com