राजस्थानमध्ये टोळधाड

जैसलमेर जिल्ह्यात खुल्या वाळवंट भागात सध्या टोळ आढळले आहेत. सध्या या भागात पिके नाहीत. परंतु येणाऱ्या दिवसांत पेरणी होणाऱ्या खरीप पिकांवर याचे प्रमाण लवकरच वाढण्याची शक्यता आहे. मात्र, जोरदार वाऱ्यांमुळे सीमेपलीकडून टोळ मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत, हे मोठे आव्हान आहे. - के. एल. गुजर, लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन, जैसलमेर
टोळधाड
टोळधाड

नवी दिल्ली: पाकिस्तानातील सिंध प्रांतात टोळधाडीने (डेझर्ट लोकस्ट) धुडगूस घातल्यानंतर आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे. राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवरील भागातील ५ हजार ४८१ हेक्टरवरील पिकांवर टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या भागातील खरीप पिके आता संकटात आली आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. राजस्थानमध्ये जवळपास दशकानंतर टोळ आढळून आले आहेत. ‘‘राज्यातील बारमेर, जैसलमेर, श्री गंगानगर आणि जोधपूर या जिल्ह्यांमध्ये टोळाचा प्रादुर्भाव झाला आहे. या भागात यंदा २१ मे रोजी पहिले टोळ आक्रमण झाले त्यानंतर ३० जून रोजी पिकांवर दुसऱ्यांदा आक्रमण झाले. राज्यात टोळाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने एक ते सात जूनच्या दरम्यान बारमेर, जैसलमेर, बिकानेर आणि नागौर या जिल्ह्यांमध्ये पंचनामे केल्यानंतर टोळाचे काही गट आढळून आले होते,’’ अशी माहिती प्रशासनाने दिली.   प्रशासनाने टोळ नियंत्रणासाठी टीम पाठविल्या असून, पहिले आक्रमण नियंत्रणात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील टोळांवर नियंत्रणाचे काम सुरू आहे. आता राज्यातील पश्‍चिम भागात तुडतुड्यांचे पसरविण्याचे काम सुरू झाले आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर टोळांचे प्रमाण यामुळे वाढेल, त्यामुळे नियंत्रण टीमने तातडीने नियंत्रणाचे काम करावे असे, प्रशासनाने सुचविनले आहे.   खरीप पिकांना धोका राजस्थानमधील टोळ प्रादुर्भावग्रस्त भागात सध्या पेरणी रखडलेली आहे; परंतु खरीप पेरणी लवकरच वेग घेण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान आणि शेजारच्या गुजरात राज्यांत खरिपात घेतल्या जाणाऱ्या मोती बाजरी, भात, मका, तूर, ऊस, बार्ली, कापूस, फळांची झाले आणि भाजीपाला पिकाला धोका आहे. `डेझर्ट लोकस्ट’ प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात प्रजनन करतात. टोळाचा एक मोठा थवा ३५ हजार लोकांना एक दिवस लागणाऱ्या अन्नाचे नुकसान करू शकतात.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com