सव्वालाख हेक्टरवरून टोळधाडीचे उच्चाटन 

सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाना या सहा राज्यांतील एक लाख ३२ हजार ७७७ हेक्टरवरून टोळधाडनिर्मूलन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
locust
locust

नवी दिल्ली: सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाना या सहा राज्यांतील एक लाख ३२ हजार ७७७ हेक्टरवरून टोळधाडनिर्मूलन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, अशी माहिती सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली.  देशात जून महिन्यात टोळधाडीने जवळपास सात राज्यांमध्ये शिरकाव करत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यामुळे केंद्रीय कृषी विभाग आणि राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाना आणि बिहार राज्य कृषी विभागाने एकत्रित नियंत्रणात्मक अभियान राबविले होते. राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, जोधपूर, नागौर, सिकर, जयपूर आणि अलवर या जिल्ह्यांतील १९ ठिकाणी टोळ नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात आल्या; तसेच मध्य प्रदेशातील तुकामगढ जिल्ह्यातील दोन ठिकाणी हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली. 

टोळनियंत्रणासाठी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रादुर्भावग्रस्त भागात ६० पथके आणि केंद्राचे २०० कर्मचारी फवारणी यंत्रांसह दाखल झाले आहेत. राजस्थानमधील बारमेर, जैसरमेर, बिकानेर, नागौर आणि फोलोदी या भागात ५ कंपन्या १२ ड्रोनसह पाठविण्यात आल्या आहेत. प्रादुर्भावग्रस्त राज्यांमध्ये टोळधाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राजस्थानमध्ये जैसलमेर, बारमेर, जोधपूर, नागौर, सिकर, जयपूर आणि अलवर भागांत आणि मध्य प्रदेशातील टिकामगढ भागात अपरिपक्व गुलाबी टोळ आणि परिपक्व पिवळ्या टोळचे थवे आहेत. 

सोमालियातील टोळ येण्याची भीती  अन्न आणि कृषी संस्थेने २७ जून रोजी दिलेल्या महितीनुसार, सोमालियातील टोळधाडीचे थवे भारत-पाक सीमेलगतच्या वसंत ऋतूमध्ये प्रजनन ठिकाणे असलेल्या भागात स्थलांतर करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांताच्या आग्नेय भागात भारताच्या सीमेजवळ काही टोळधाडीच्या थव्यांनी अंडी घालण्यास सुरुवात केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com