agriculture news in Marathi locust moved in Madhya pradesh and drone came in Nagpur Maharashtra | Agrowon

टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला नागपुरात 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी टोळधाड बुधवारी (ता.३) सावनेर तालुक्‍यातून पुढे मध्यप्रदेशातील पांढूर्णाकडे सरकल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी टोळधाड बुधवारी (ता.३) सावनेर तालुक्‍यातून पुढे मध्यप्रदेशातील पांढूर्णाकडे सरकल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विशेष म्हणजे नागपूर दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता.२) अवघ्या दोन दिवसात टोळधाडीच्या नियंत्रणाचा दावा केला होता. 

राजस्थानातून मध्यप्रदेशात दाखल झालेल्या टोळधाडीने सातपुडा पर्वतरांगा ओलांडत २४ मे रोजी अमरावती जिल्ह्यातील संत्र्याचे आगार असलेल्या मोर्शी, वरुड तालुक्‍यात प्रवेश केला होता. त्यानंतर चार गटात या किडीचा झुंड विभागल्या गेल्या. त्यातील एक भंडारा, एक वर्धा एक नागपूर तर एक अमरावती जिल्हयात होता.

काटोल तालुक्‍यात किडीने संत्रा, मोसंबीची नवती फस्त केली तर ज्या ठिकाणी खाण्यासाठी काहीच मिळाले नाही अशा भागात कडुनिंबाच्या झाडावरील हिरव्या पानांसह सागवान झाडाची पाने, भाजीपाल्याचा फडशा या किडीने पाडला. संत्रापट्टयात या किडीने सर्वाधीक नुकसान केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

धानपट्टयात किडीकडून उन्हाळी धानाला देखील लक्ष्य करण्याची भिती वर्तविली जात होती. शेतकऱ्यांसह कृषी विभागाची चिंता यामुळे वाढीस लागली होती. तोंडावर असलेल्या खरिपातील पिकांनाही या किडीचा धोका असल्याने या चिंतेत अधिकच वाढ झाली. त्यामुळे नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजनांवर भर देण्यासाठी ड्रोन किंवा हेलिकॉप्टरचा वापर करण्याची मागणी होऊ लागली. 

अखेर ड्रोन दाखल 
कृषीमंत्री दादा भुसे हे मंगळवारी (ता.२) नागपूर दौऱ्यावर होते. याच दिवशी ॲग्रोवनमध्ये टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या उपलब्धतेबाबत अनिश्‍चीततादर्शक वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर तत्काळ हालचाल होत बुधवारी (ता.३) पुण्यावरून एका खासगी कंपनीकडून फवारणी ड्रोनची उपलब्धता करण्यात आली. त्याची चाचणी देखील कृषिमंत्र्यांसमोर घेण्यात आली. आता मात्र टोळधाड उरली नसल्याने आठवडाभर ड्रोनला नागपुरात ठेवले जाणार आहे. या ड्रोनला चार नोझल असून दहा लिटरची त्याची क्षमता आहे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...