agriculture news in Marathi locust threat to rabbi crops Maharashtra | Agrowon

रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबल्याने भारत-पाकिस्तान सीमाभागात टोळधाडीचा प्रादुर्भाव कायम आहे. लांबलेल्या मॉन्सूनमुळे पोषक स्थिती असल्याने टोळचा मुक्कामही लांबला आहे. त्यामळे शेतात असलेल्या खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) प्रसिद्ध केलेल्या अहवाल दिली आहे. 

नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबल्याने भारत-पाकिस्तान सीमाभागात टोळधाडीचा प्रादुर्भाव कायम आहे. लांबलेल्या मॉन्सूनमुळे पोषक स्थिती असल्याने टोळचा मुक्कामही लांबला आहे. त्यामळे शेतात असलेल्या खरीप पिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) प्रसिद्ध केलेल्या अहवाल दिली आहे. 

‘‘यंदा उन्हाळ्यापासून राजस्थान आणि कच्छ भागात टोळप्रभावित जवळपास दोन लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर नियंत्रण पथकाने नियंत्रणात्म उपाय केले आहेत. तर नोव्हेंबरपासून १३ हजार २८ हाजर हेक्टर क्षेत्रावर उपाय केले आहेत. १ ते १० नोव्हेंबर या काळात पाकिस्तानमधील चोलिस्तान, नारा आणि थारपारकर वाळवंटात येथे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नियंत्रणात्मक उपाय केले आहेत. परंतु, मॉन्सून लांबल्याने भागात अद्यापही हिरवळ कायम असल्याने टोळचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे पिकांवरील धोकाही कायम आहे,’’ असेही ‘एफएओ’ने म्हटले आहे.

टोळचे वेळीच प्रभावी नियंत्रण न केल्यास शेतात असलेल्या खरीप पिकांचे आणि येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. टोळ एक छोटा थवाही २५०० लोकांना एक दिवस लागणाऱ्या अन्नाएवढे नुकसान करू शकते. राजस्थान आणि गुजरात मध्ये लहान धान्ये, भात, मका, तूर, ऊस, बार्ली, कापूस आणि भाजीपाल्याचे उत्पादन होते. 

राजस्थानात १९९३, १९९७, २००५ आणि २०१० मध्ये टोळचे आक्रमण झाले होते. १९९३ मध्ये तीन लाख १० हजार ८८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर २००५ मध्ये १६ हजार ४४० हेक्टरवरील पीक टोळने फस्त केले होते, अशी माहिती राज्यस्थान सरकारने दिली. 

स्थलांतराला प्रारंभ
टोळचे काही थवे उन्हाळ्यात प्रजनन होणाऱ्या भागातून, भारत-पाकीस्तन सीमेसह स्थलांतर करत आहेत. टोळचे प्रजनन या भागात उन्हाळ्यात वाढते. काही थव्यांनी स्थलांतर सुरू केले असले, तरीही राजस्थान आणि गुजरातमध्ये टोळचे संकट कायम आहे. या दोन्ही राज्यांत टोळने मे महिन्यापासून पिकांचे मोठे नुकसान केले. या भागातील चांगल्या पावसाने नाकतोड्यांच्या प्रजननास मदत झाली आहे. 

उपायानंतरही धोका 
टोळ नियंत्रणासाठी भारत सरकारने राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये विविध उपाय केले आहेत. परंतु, पोषक वातावरणामुळे टोळची संध्या कमी करणे कठीण झाले आहे. सरकारने टोळ नियंत्रण पथक स्थापन केले आहे. या पथकाने जुलैमध्ये या दोन्ही राज्यातील पाकिस्तान सीमेवरील ३० हजार ४२३ हेक्टर क्षेत्रावर नियंत्रणात्मक उपाय केले आहेत. 

इतर देशांनाही धोका
भारताबरोबरच इतर देशांनाही धोका असल्याचे ‘एफएओ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. टोळचा प्रवास करण्याच्या मार्गावर असणाऱ्या देशांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सौदी अरेबिया, इथियोपिया, सोमालिया, केनिया, सुदान आणि येमेन या देशांमध्ये टोळचे मोठे आक्रमण होण्याची शक्यता आहे, असा इशारा ‘एफएओ’ने दिला आहे.


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...