agriculture news in Marathi locust will be control in two days Maharashtra | Agrowon

टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून दहशत पसरविणाऱ्या टोळधाडीवर येत्या दोन दिवसांत नियंत्रण मिळविण्यात येईल, असा विश्‍वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्‍त केला.

नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून दहशत पसरविणाऱ्या टोळधाडीवर येत्या दोन दिवसांत नियंत्रण मिळविण्यात येईल, असा विश्‍वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्‍त केला. त्याकरिता आवश्‍यक त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 

राजस्थान, पंजाब त्यानंतर मध्यप्रदेशात दाखल झालेल्या टोळधाडीने २४ मे रोजी पूर्व विदर्भातील जिल्हयात शिरकाव केला. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्हयात टोळधाडीने संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यासह कापणीच्या अवस्थेत असलेल्या धान पिकांचा देखील फडशा पाडला.

दहा दिवसांपासून किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. मात्र त्यात अपेक्षीत यश मिळाले नाही. खरिपापूर्वी किडीला हुसकावण्यात यश न आल्यास खरीप हंगाम गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते की काय ? यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. 

कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता.२) नागपुरात पोचत टोळधाड नियंत्रण कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी टोळधाडीवर येत्या दोन दिवसात नियंत्रण मिळविण्यात येईल, असा दावा केला. त्याकरिता ड्रोनचा पर्याय विचाराधीन आहे. परंतु असे करताना त्या भागातील पाण्याचे स्रोत, साठे तसेच इतर नैसर्गिक संसाधनांना काही हानी पोचते का ? याचाही विचार करावा लागणार आहे. त्याविषयीची तांत्रिक माहिती घेऊनच ड्रोनचा वापर केला जाईल.

ड्रोनच नाही तर इतरही पर्यायाच्या माध्यमातून या किडीला हुसकावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये बियाणे, खताची मुबलकता आहे. त्यामुळे कोठेही काळाबाजार झाल्यास अशा व्यक्‍तींविरोधात कारवाईचा इशाराही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिला. 

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे (भगत), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते. 

केंद्रीय कृषिमंत्र्याची घेणार भेट 
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. निवडणुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे काम प्रभावित झाले होते. काही शेतकऱ्यांची अनेक खाते होते. अशाप्रकारच्या अनेक अडचणी आल्या. त्रुटी दूर करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना दोन्ही हप्ते मिळावे याकरिता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नागपूर विभागात टोळधाडीचा मुक्‍काम 
गेल्या दहा दिवसांपासून टोळधाड नागपूर विभागातील जिल्हयात वास्तव्यास असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवारी सावनेर तालुक्‍यातील मंगसा, पोहना, भोजापूर या शिवारात कृषी विभागाकडून या किडीला हुसकावण्याचे प्रयत्न झाले. 
 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...