गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा करू नका ः पवार  

सोलापूर येथील प्रचारसभेत बोलताना शरद पवार
सोलापूर येथील प्रचारसभेत बोलताना शरद पवार

सोलापूर  ः गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अपघाताने सत्ता मिळाली. साडेचार वर्षांत त्यांनी देश कुठं नेऊन ठेवलाय हे आपल्यासमोरच आहे. गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा करू नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली.  

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. ३) आयोजिलेल्या सभेत श्री. पवार बोलत होते. व्यासपीठावर श्री. शिंदे, आमदार भारत भालके, रामहरी रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, माजी आमदार दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, प्रकाश वाले, मनोहर सपाटे उपस्थित होते. 

यावेळी श्री. शिंदे म्हणाले, की नोकरीत असताना श्री. पवार यांनीच मला राजकारणात आणले. मी अनेक निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत ते पाठीशी राहिले. आता शेवटच्या निवडणुकीतही मला त्यांचा आशीर्वाद हवा आहे. 

पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदेंचा अर्ज माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांनी अर्ज भरला. त्यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार हे शिंदेंसह थेट निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार भारत भालके, दीपक साळुंखे, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. स्वतः पवार यांनी येथे येऊन माढा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज भरण्याबाबत दाखवलेली उत्सुकता, हा त्यांच्या रणनीतीचा भाग समजला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com