अकोला, बुलडाण्यात प्रचार वेगात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला   ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अकोला, बुलडाणा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान होणार आहे. प्रचारासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. प्रचारसभा, मतदारांच्या भेटीगाठींवर उमेदवारांनी भर दिला आहे.

या दोन मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता अवघे सहा दिवस राहिलेले आहेत. मतदानापूर्वी काही तास आधी प्रचार बंद केला जातो. त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रचार वेगाने सुरू झाला. उमेदवारी निश्चित झाल्यापासून प्रचारात फारसा उत्साह दिसत नव्हता. अकोला तसेच बुलडाण्यात तिरंगी लढतीचा अंदाज असला तरी, आता जसजशी मतदानाची वेळ जवळ यायला लागली, तशी समीकरणे बदलू लागली आहेत.

जप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या उमेदवारांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित आघाडी हा तिसरा पर्याय मतदारांना उपलब्ध आहे. परंतु सध्या प्रचाराची दिशा पाहता ही आघाडी तितकासा जोर मारेल असे दिसत नाही. थेट लढत असल्याने उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिलेला आहे. वातावरण तापविण्यासाठी आता प्रचारसभा घेण्याकडे कल आहे.

याचाच एक भाग म्हणून अकोल्यात गुरुवारी (ता. ११) भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मोठी सभा झाली. इतर उमेदवारांसाठी तर अद्यापही मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा झालेल्या नाहीत. तिकडे बुलडाणा मतदार संघातसुद्धा अशीच स्थिती आहे. या ठिकाणी युतीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (ता. १२) रात्री सभा आयोजित करण्यात आली होती. इतर मोठ्या नेत्यांची एकही सभा मात्र झालेली नाही. उमेदवारांनी आतापर्यंत  छोट्यामोठ्या सभा घेतल्या. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटींवर भर दिला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com