प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे
प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे

देशाला मोदींसारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज : पंकजा मुंडे

हिंगोली  ः देशातील जनतेला सुरक्षेच्‍या सावलीत नांदविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

येथील महात्‍मा गांधी चौकात रविवारी (ता. ७) महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्‍या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्‍हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तान्‍हाजी मुटकुळे, आमदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेना जिल्‍हाप्रमुख संतोष बांगर, मिलिंद यंबल उपस्‍थित होते.

या वेळी पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या की, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्‍य करा ही नीती अवलंबली होती. ब्रिटिशांचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी करीत आहेत. देशद्रोहाचा गुन्‍हा रद्द करणार, अशी भाषा करणारे देशाला कसे परवडतील, असा सवाल यांनी केला.  राजकारणात काका-पुतण्याची झळ आम्‍हालाही बसली आहे. ग्रामविकासमंत्री झाल्‍यानंतर आपल्‍याला रोखण्यासाठी विरोधी पक्ष पद दिलेल्‍यांनी तोडपाणी करण्यात हयात घालविल्‍याचा आरोप पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्‍यावर केला. आमच्‍या पक्षात असताना बीडमध्ये भाजपचे कमी आमदार विजयी होत होते. मात्र, आता पक्षातून गेल्‍यानंतर भाजप आमदारांची संख्या वाढली. तर, राष्‍ट्रवादीच्‍या आमदारांची संख्या घटली. हा त्‍यांचा पायगुण असल्‍याचे सांगत त्यांनी मुंडे यांच्‍यावर टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com