राज ठाकरे यांना मोदी द्वेषाने पछाडले : फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे  यांचे दुकान उदध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक येथे शनिवारी (ता.२७) आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार संजय राऊत, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, दत्ता गायकवाड, वसंत गिते आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नाशिक  महापालिकेत मनसेची सत्ता असताना केंद्र व राज्यात भाजपचे सरकार होते. आमच्या सरकारने त्यांना पैसा पुरविला, त्यामुळे मनसेचे इंजिन सुरळीत चालू शकले. आम्हीच दिलेल्या पैशांवर विकासकामे केली. मात्र त्याचे सर्व श्रेय ठाकरे आता घेत आहेत. नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सध्या २ हजार कोटींची कामे सुरू आहेत; मात्र मोदीद्वेषाने डोळ्यांवर झापडे पडल्यामुळे ठाकरे यांना ती विकासकामे दिसणार नाहीत. जशी सायकल, मोटारसायकल भाडे तत्त्वावर मिळते; तसेच  शरद पवार  यांनी राज ठाकरे यांचे ‘इंजिन’ भाडेतत्त्वावर घेतले असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. 

या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह आघाडी सरकारवर फडणवीस यांनी सडकून टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com