पंढरपूर, अक्कलकोटला मुख्यमंत्र्यांची बुधवारी सभा 

पंढरपूर, अक्कलकोटला मुख्यमंत्र्यांची बुधवारी सभा
पंढरपूर, अक्कलकोटला मुख्यमंत्र्यांची बुधवारी सभा

सोलापूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (ता. १०) जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांत प्रचारसभा घेणार आहेत. त्याचदिवशी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे हे आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री अक्कलकोटला दुपारी तीन वाजता सभा घेतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली. 

श्री. काळे यांच्या पक्ष प्रवेशाने पंढरपूर तालुक्‍यात भाजपची ताकद वाढणार आहे. त्याचा फायदा सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षाला होणार आहे. पंढरपूर तालुक्‍यातील काही गावे सोलापूर, तर काही गावे माढा मतदारसंघाला जोडली आहेत. श्री. फडणवीस हे काळे यांना पक्षात प्रवेश देऊन थेट अक्कलकोटला डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

त्याचबरोबर पुढील आठवड्यात अनेक केंद्रीय मंत्री जिल्ह्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथसिंह, सुरेश प्रभू यांच्याही प्रचारसभा होणार आहेत. शुक्रवारी (ता. १२) केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे सोलापुरात बुद्धिवंतांचा मेळावा घेणार आहेत. मंगळवारी (ता. ९) राजनाथसिंह हे सोलापुरात प्रचारसभा घेतील. त्यांची सभा सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्‍यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com