काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक शेतकऱ्यांचे दुश्मन ः पंतप्रधान मोदी

नगर येथील प्रचारसभेत अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
नगर येथील प्रचारसभेत अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

नगर  : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नियतीला जनतेने ओळखले आहे. लोकांनीच देशातून काँग्रेस हटावचा नारा दिलेला आहे. देशातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे कॉँग्रेस - राष्ट्रवादी हेच खरे दुश्मन आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर जाहीर टीका करत मोदी यांनी स्वतःच ‘एक बार - मोदी सरकार’ असा नारा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (ता. १२) नगर येथे जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खासदार दिलीप गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी आमदार अनिल राठोड, चंद्रशेखर कदम, बबनराव पाचपुते, उमेदवार डॉ. सुजय विखे व सदाशिव लोखंडे या वेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. मोदी म्हणाले, की सबका साथ सबका विकास हा संकल्प घेऊन भाजप सरकार काम करत आहे. पाच वर्षांत देशाला मजबूत सरकार दिले हे देशाने आणि जगाने पाहिले आहे. अगोदर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये दररोज घोटाळे बाहेर येत होते. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी बाॅंबस्फोटाचे प्रकारे घडत होते. या देशाचा चौकीदार इमानदार असून, काॅंग्रेसचे व राष्ट्रवादीचे लोक घोटाळेबाज आहेत. दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही.

काँग्रेस सरकारने देशातील गरीब जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत. परत एकदा मोदी सरकार येणार असून, आमचे सरकार आल्यानंतर देशातील लहान शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणार आहे. पशुपालकाला किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इथेनॉलनिर्मिती करण्याचाही सरकारचा संकल्प आहे. पश्चिम घाटातून वाया जाणारे पाणी शेतीला मिळावे यासाठी नदीजोड प्रकल्प प्रभावीपणे हाती घेतला जाणार आहे, असे श्री. मोदी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com