नगरच्या दुष्काळमुक्तीसाठी संग्राम जगताप यांना लोकसभेत पाठवा

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

नगर  ः राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्‍न वेगळे आहेत. येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून नगरच्या दुष्काळाची पाहणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर नगरला दुष्काळमुक्त करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी येथे झालेल्या सभेत श्री. पवार बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार अरुण जगताप, उमेदवार संग्राम जगताप, आमदार वैभव पिचड, राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, राजेंद्र नागवडे, डॉ. अशोक विखे, प्रताप ढाकणे, घनश्‍याम शेलार आदी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, की १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातून सुमारे २५ ते ३० तरुणांना लोकसभेत येण्याची संधी दिली होती. त्या वेळी कोणी तरी चव्हाण यांना नवख्यांना संधी दिल्याचे विचारले होते. त्यावर चव्हाण यांनी, आपली पिढी काही दिवसांनी राजकारणात थांबणार आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करता, पुढील ५० वर्षांचे नेतृत्व तयार करणे आवश्‍यक असल्याने तरुणांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मीही हाच कित्ता गिरवला. या वेळी महाराष्ट्रातून अनेकांना दिल्लीत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे यांनीही विखे पिता-पुत्रांवर शरसंधान साधले. डॉ. सुजय हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकले आहेत. त्यांची हुशारी चुलता म्हणून मला चांगली माहिती आहे. त्यामुळे ते खूप हुशार आहेत हा दावा हास्यास्पद ठरतो, असे ते म्हणाले. 

विखे यांचे बंधू राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढत असून, एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे बंधू आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे चुलते डॉ. अशोक विखे पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर होते. या वेळी त्यांनी जोरदार भाषण केले. त्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com