agriculture news in marathi, lok sabha election campaign,nagar, maharashtra | Agrowon

राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपवा ः ॲड. आंबेडकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी कॉंग्रेसने आतापर्यंत मतदान करायला भाग पाडले. हीच कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर कधीही आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप हे एकमेकांसाठी पूरक पक्ष असून, त्यांच्यापासून देश व संविधानाला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी कॉंग्रेसने आतापर्यंत मतदान करायला भाग पाडले. हीच कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर कधीही आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप हे एकमेकांसाठी पूरक पक्ष असून, त्यांच्यापासून देश व संविधानाला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या नगर व शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी डॉ. आंबेडकर यांची शेवगावात शुक्रवारी (ता. १९) सभा झाली. या वेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, की लोकशाहीची दारे सर्वसामान्य लोकांसाठी मोकळी करायची असतील, तर तीच ती कुटुंबे राजकारणातून बाजूला सारली पाहिजेत. वारंवार याच कुटुंबांतील व्यक्तींना सर्वच पक्ष उमेदवारी देतात, ही एक प्रकारे ‘मॅच फिक्‍सिंग’च आहे. आम्ही कुटुंबशाहीवर बोललो, तर जातीवर बोलल्याचा आरोप केला जातो. मात्र, एकाही पक्षाने सर्व जाती-धर्माच्या लोकांना उमेदवारी का दिली नाही, याचे उत्तर द्यावे. 

शरद पवार यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा आरोप करून आंबेडकर म्हणाले, की तुम्ही भाजपला हरविण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करणार असाल, तर उद्या हीच राष्ट्रवादी मोदी व भाजपसोबत जाणार नाही, याची शाश्‍वती काय? कॉंग्रेसच्या कुटुंबशाहीसोबत असल्यामुळेच मुस्लिमांची वाताहत झाली. त्यामुळे वर्षानुवर्षांची कॉंग्रेसची साथ सोडून या वेळी मुस्लिमांनी विचारपूर्वक मतदान करावे. महाराष्ट्रातील वंचितांचा चेहरा फुलविण्यासाठी सर्व जाती-धर्मातील वंचित घटकांनी संघटित होण्याची वेळ आता आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...