एनडीए सरकारने रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

एनडीए सरकारने रखडलेले  सिंचन प्रकल्प पूर्ण केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
एनडीए सरकारने रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नांदेड : शेतकऱ्यांना शेतीमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत समर्थन मूल्य देण्याचे आश्वासन एनडीए सरकारने पूर्ण केले. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर दरवर्षी ७५ हजार कोटी रुपये थेट जमा करण्याचे काम केले. त्याचबरोबरच कॉंग्रेसच्या काळातील रखडलेले मोठे सिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे कामदेखील एनडीए सरकारने केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नांदेड येथील असर्जन -कौठा येथील (मामा चौक) येथे शनिवारी (ता.६) भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत श्री. मोदी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड), संजय (बंडू) जाधव (परभणी), हेमंत पाटील (हिंगोली), सुधाकर श्रृंगारे (लातूर), भास्करराव पाटील खतगांवकर, संतुकराव हंबर्डे, धनाजीराव देशमुख आदी उपस्थित  होते.

श्री. मोदी म्हणाले, की कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या घरातून शेतीमाल खरेदीचे आश्वासन दिले होते. परंतु ते बाजार समित्यांमध्ये देखील शेतीमालाची खरेदी करू शकले नाहीत. कॉंग्रेसच्या प्रत्येक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु एनडीए सरकारने कॉंग्रेसच्या काळातील रखडलेले देशातील ९९ मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम केले. महाराष्ट्रात कॉंग्रेस कमजोर झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेसचे जेवढे आमदार आहेत, त्यापेक्षा अधिक गट या पक्षात आहेत. त्यामुळे कॉंग्रेस देशाचे भले करू शकत नाही. देशात भ्रष्टाचार वाढीस कॉंग्रेसच कारणीभूत आहे. बोफोर्सपासून हेलिकॉप्टर खरेदीपर्यंत देशाच्या संरक्षणाशी संबंधीत घोटाळे कॉंग्रेसच्या काळातील आहेत. भाजपने सुरक्षित तसेच नवा भारत निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.

श्री. फडणवीस म्हणाले, की अशोक चव्हाण यांना अनेकदा संधी दिली. ते मंत्री होते, मुख्यमंत्री होते. परंतु ते नांदेडचा चेहरा बदलू शकले नाहीत. अशोकराव लीडर नसून डिलर आहेत. नांदेडला लीडरची गरज आहे. त्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com