agriculture news in marathi, lok sabha election campaign,nashik, maharashtra | Agrowon

शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध  माझा लढा : पंतप्रधान मोदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महागाई वाढताच काँग्रेस गोंधळ घालून गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परिस्थिती संतुलित ठेवण्यासाठी माझा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.

नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महागाई वाढताच काँग्रेस गोंधळ घालून गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परिस्थिती संतुलित ठेवण्यासाठी माझा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. २२) पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, हरिश्चंद्र चव्हाण, ज्‍येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, आमदार बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. मोदी म्हणाले, की नाशिकला लवकरच ड्रायपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय ऐतिहासिक आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून ५ एकरांची अट रद्द करण्यात येईल. शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम येऊ लागली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार हे निश्चित  आहे. भारताकडे वक्रदृष्टी करण्याअगोदर शत्रू शंभर वेळा विचार करतो. समोरच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलणार हे मागील निवडणुकीत बोललो होतो. त्याचा प्रत्यय या पाच वर्षांत आला असेल. भारत देशाचा जगात जयजयकार झाला. हे केवळ जनतेच्या मतदानामुळे शक्य झाले. देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या विषयांवर काम करत आहे. मात्र, काहींना याचा शॉक लागतो आणि यातून माझ्यावर टीका केली जाते, असे श्री. मोदी म्हणाले.

श्री. फडणवीस म्हणाले, की, राष्ट्रवादीचे बहुरूपी शौर्य दाखवून नाही तर भ्रष्टाचार केल्यामुळे जेलमध्ये गेले. शरद पवार सध्या सद्‌सद्‌विवेकबुद्धी जागेवर नसल्यासारखी विधाने करत असून मोदींनी गुगली टाकल्याने ते पॅव्हेलीयन मध्ये परतले आहेत.

सभा सुरू असताना उपस्थितांनी फिरवली पाठ 
या प्रचार सभेत रामदास आठवले, अनिल कदम,  राहुल आहेर,  देवयानी फरांदे, हेमंत गोडसे  आणि  डॉ. भारती पवार यांची भाषणे झाली. मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना काही मिनिटांतच अनेक जणांनी सभेकडे पाठ फिरवली व मंडपाबाहेर अनेक उपस्थितांचे घोळके बाहेर पडल्याचे दिसून आले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...