महाराष्ट्रात सतरा मतदारसंघांत आज मतदान

महाराष्ट्रात सतरा मतदारसंघांत आज मतदान
महाराष्ट्रात सतरा मतदारसंघांत आज मतदान

पुणे ः राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश आज (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराची शनिवारी (ता.२७) सांगता झाली.

या शेवटच्या टप्प्यात सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी दिग्गजांनी शनिवारी सभा, रोड शो करीत प्रचाराची राळ उडवून दिली. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

येथे होणार मतदान नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी.   अशा असतील लढती

  • नंदुरबार ः के. सी. पाडवी (काँग्रेस) विरुद्ध हीना गावित (भाजप)
  •   धुळे ः कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) विरुद्ध डॉ. सुभाष भामरे (भाजप)
  •   दिंडोरी ः धनराज महाले (राष्ट्रवादी) विरुद्ध भारती पवार (भाजप)
  •   नाशिक ः समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना)
  •   पालघर ः बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) विरुद्ध राजेंद्र गावित (शिवसेना) 
  • भिवंडी ः सुरेश टावरे (काँग्रेस) विरुद्ध कपिल पाटील (भाजप)
  •  कल्याण ः श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
  •  ठाणे ः राजन विचारे (शिवसेना) विरुद्ध आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
  •  उत्तर मुंबई ः ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस) विरुद्ध गोपाळ शेट्टी (भाजप)
  • उत्तर मध्य मुंबई ः प्रिया दत्त (काँग्रेस) विरुद्ध पूनम महाजन (भाजप) 
  • वायव्य मुंबई ः संजय निरूपम (काँग्रेस) विरुद्ध गजानन कीर्तिकर (शिवसेना) 
  • ईशान्य मुंबई ः संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध मनोज कोटक (भाजप)
  • दक्षिण मध्य मुंबई ः एकनाथ गायकवाड (काँग्रेस) विरुद्ध खासदार राहुल शेवाळे (शिवसेना)
  • दक्षिण मुंबई ः मिलिंद देवरा (काँग्रेस) विरुद्ध अरविंद सावंत (शिवसेना)
  • मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना)
  • शिरूर ः डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
  • शिर्डी ः भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) विरुद्ध सदाशिव लोखंडे (शिवसेना)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com