agriculture news in marathi, lok sabha election campaign,sangli, maharashtra | Agrowon

धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव जानकर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठीशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला.

भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शुक्रवारी (ता १९) श्री. जानकर सांगलीत आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते. 

सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठीशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला.

भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शुक्रवारी (ता १९) श्री. जानकर सांगलीत आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते. 

मंत्री जानकर म्हणाले, की भाजप सरकार सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेणार होते. मात्र चळवळीत बोलताना संसदीय राजकारण कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण दिले आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न आहे. तो राज्य सरकारच्या हातात नसून केंद्राच्या हातात आहे. त्यावर न्यायालयात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राज्य सरकारची समाजाला न्याय देण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपमुळेच मिळणार आहे.

ते म्हणाले, की कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार वाईट होते असे म्हणणार नाही. मात्र, त्यांच्या काळात सामाजिक भागिदारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या आघाडी सरकारने शेळी मेंढी विकास महामंडळाला निधी दिला नाही. मात्र मी मंत्री झाल्यावर ५० कोटींचा निधी दिला. तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचा निधी दिला आहे. त्याचा शासन आदेश निवडणूक झाल्यावर निघेल.

पडळकरांवर ‘नो कॉमेंट’
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते होते. आता विरोधात गेले आहेत. याबाबत मंत्री जानकर म्हणाले, की मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. जे पक्षात नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मला मानणारा वर्ग समाजात आहे. आजही समाज माझ्याच मागे आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...