नितीन गडकरी
नितीन गडकरी

विकासाला गती देण्यासाठी मोदी सरकारचा पर्याय ः नितीन गडकरी 

सोलापूर   ः अवघ्या साडेचार वर्षांत देशाचा विविध अंगाने विकास करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. पारदर्शी कारभारासह सिंचन, रस्ते यांसारख्या विविध पायाभूत सुविधांवर भर दिला. अनेक नवीन बदल आपण पाहिले आणि अनुभवले आहेत, याच योजनांना आता आणखी गती देण्यासाठी मोदी सरकार हाच उत्तम पर्याय आहे, असे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. 

सोलापूर लोकसभेचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १६) येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात मंत्री गडकरी बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख शिवाजी सावंत आदी या वेळी उपस्थित होते. 

श्री. गडकरी म्हणाले, की गरिबी, उपासमार ही देशातील मोठी समस्या आहे. मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांची गरिबी हटली का नाही. काँग्रेस काळात आश्वासनावरच दिवस गेले. आता पुन्हा ते गरिबाचा नारा देत आहेत. काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, पण ती कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली. राजकारण हा आमचा मुळीच धंदा नाही, राष्ट्रनिर्माणाचे प्रभावी काम आम्ही करतो. २७ हजार कोटी रुपयांच्या कामाचं आश्वासन दिलं होतं. त्यातील ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आपण, आपली मुले, नातू जिवंत असेपर्यंत रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, असे रस्ते बांधतो आहे. कामाच्या मंजुरीसाठी एकाही ठेकेदाराला मला भेटावे लागत नाही.

देशात १५ एक्सप्रेस हायवे बांधतो आहे, १४ लेनचा दिल्ली ते मेरठ रस्ता बांधतो आहे. १८ टक्के सिंचनक्षेत्र ४८ टक्क्यांवर न्यायचं आहे. त्यावरही आमचं काम सुरू आहे. सोलापुरातील ५० टक्के सिंचन योजनांना आमच्या सरकारने निधी दिला, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली. म्हतारपणात निवडणूक लढवणे योग्य नाही, आतापर्यंत तुम्ही काय केले आहे, ते सर्वांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com