मावळात ५९.४९ टक्के मतदान; श्रीरंग बारणे-पार्थ पवार यांच्यात लढत

मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होती
मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होती

पुणे  ः मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. मतदारसंघात ५९.४९ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

या निवडणुकीत प्रथमच निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. या मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यामध्ये लढत होत आहे.

मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग कमी होता. मात्र, नऊ वाजेनंतर मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर नागरिकांची गर्दी कमी झाल्यामुळे मतदानाची गती काही प्रमाणात मंदावली होती. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानासाठी अधिक उत्साह दिसून आला.

शहरी भागात मतदान केंद्रांची संख्या अधिक असल्याने मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार धावाधाव करीत असल्याचे दिसून आले. तळेगाव येथील केंद्र क्र. २३५ व लोणावळा येथील १४१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदानयंत्रात बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले.

या मतदारसंघामध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह २१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सोमवारी सकाळी थेरगाव येथील केंद्रावर श्रीरंग बारणे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजाविला. राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि अजित पवार यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान

मतदारसंघ एकूम मतदान झालेले मतदान मतदान टक्के
पनवेल ५३९१८७ २९८३४९ ५५.३३
कर्जत २७९७९० १८९५७७ ६७.७६
उरण २९०२७३ १९५१०१ ६७.२१
मावळ ३३७६५७ २११३८३ ६२.६०
चिंचवड ५०२७४० २८३००४ ५६.२९
पिंपरी ३४७७५८ १८९४०४ ५४.४६
एकूण २२९७४०५ १३६६८१८ ५९.४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com