संग्राम जगताप यांनी केला शेतकरी दांपत्याच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल

संग्राम जगताप यांनी शेतकरी दांपत्याच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल केला
संग्राम जगताप यांनी शेतकरी दांपत्याच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल केला

नगर  : नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी बबनराव रासकर, अंजनाबाई बबनराव रासकर यांच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी जगताप यांनी नगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करून रॅली काढली.  राज्याच्या राजकारणात खास चर्चेत असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी- काँग्रेस  आघाडीकडून आमदार संग्राम जगताप निवडणूक लढवत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी तीन मंत्र्यांसह आमदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून रॅली काढत अर्ज दाखल केल्यानंतर  मंगळवारी संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. त्यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली काढली. रॅलीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. जगताप यांनी पहिल्यांदाच मोठे शक्तिप्रदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com