नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८ मतदारांची अद्ययावत यादी तयार आहे. यात नऊ लाख ७० हजार ६३१ पुरुष, आठ लाख ८३ हजार ५२९ महिला व अन्य ८८ मतदारांचा समावेश आहे.  मंगळवारी (ता. २३) मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. पोलिस अधीक्षक इशू सिंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी या वेळी उपस्थित होते. 

द्विवेदी म्हणाले, की दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. १५२ मतदान केंद्रांवर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९२ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.  सर्व मतदान केंद्रांवर आठ हजार ९३२ अधिकारी व कर्मचारी, तसेच १९८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान साहित्य घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी एक दिवस आधीच ४४६ वाहनांद्वारे मतदान केंद्रांवर पोचतील. या वाहनांना जीपीएस प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगर मतदारसंघात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. तरीही संशयास्पद असलेल्या काही ठिकाणांवर करडी नजर राहणार असून, मोठा फौजफाटा तैनात राहील. नगर मतदारसंघात दहा मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र म्हणून निश्‍चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी वगळता इतरांना मोबाईल बाळगण्यास बंदी आहे. दोनशे मीटर हद्दीबाहेर उमेदवारांना बूथ लावण्यास परवानगी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.    व्होटर्स स्लीपवर चिन्ह आढळल्यास कारवाई  नगर मतदारसंघात १४ लाख १२ हजार ८२९ मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत व्होटर्स स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांनी व्होटर्स स्लीप वाटताना सुधारित मतदार यादीचा उपयोग करावा. परंतु स्लीपवर चिन्ह येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा प्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com