agriculture news in marathi, lok sabha election, nagar, maharashtra | Agrowon

नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३० केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान साहित्य घेऊन अधिकारी-कर्मचारी सोमवारी केंद्रांकडे रवाना झाले. 

नगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३० केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान साहित्य घेऊन अधिकारी-कर्मचारी सोमवारी केंद्रांकडे रवाना झाले. 

निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या प्रक्रियेसाठी ८९३२ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदानप्रक्रियेस आज (मंगळवारी) सकाळी सात वाजेपासून सुरवात होईल. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. नगर शहर व तालुक्‍यातील मतदान केंद्रांचे साहित्यवाटप येथील तहसील कार्यालयात झाले. तहसीलदार उमेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस बंदोबस्तात हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षक भवानीश्‍वरी यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सकाळी दहा वाजेपासूनच कर्मचाऱ्यांना सीयू, बीयू व व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येत होते. सर्व साहित्य ताब्यात मिळाल्यावर साडेबारा वाजता कर्मचारी केंद्रांकडे रवाना झाले. 

नगर लोकसभा मतदारसंघात यंदा प्रथमच १० मतदान केंद्रे ही सखी मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांत पोलिसांपासून मतदान अधिकारी, कर्मचारी, असा सगळा कर्मचारी वर्ग महिलाच असतील. मतदान केंद्राचे व्यवस्थापन, कामकाज, सुरक्षाव्यवस्था पाहण्याचे काम महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत.

आकडेवारीतून निवडणूक 

  • एकूण मतदार  - १८ लाख ५४ हजार २४८ 
  • पुरुष मतदार  -  ९ लाख ७० हजार ६३१ 
  • महिला मतदार - ८ लाख ८३ हजार ५२९ 
  • अन्य मतदार -   ८८ 
  • एकूण मतदान केंद्रे - २०३० 
  • एकूण कर्मचारी  -  ८०३२ 
  • क्षेत्रीय अधिकारी  -  १९८ 
  • वाहने - ३०५ 
  • थेट प्रक्षेपण होणारी मतदान केंद्रे - १९२ 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...