agriculture news in marathi, lok sabha election, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड, हिंगोलीची जागा राखण्याचे काॅँग्रेसपुढे आव्हान

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मार्च 2019

नांदेड : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असताना महाराष्ट्रात केवळ नांदेड आणि हिंगोली मतदारसंघात काॅँग्रेसला विजय मिळाला होता. यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजप -शिवसेना युतीने तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काॅँग्रेसपुढे या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे.

नांदेड : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असताना महाराष्ट्रात केवळ नांदेड आणि हिंगोली मतदारसंघात काॅँग्रेसला विजय मिळाला होता. यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजप -शिवसेना युतीने तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काॅँग्रेसपुढे या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे.

यंदा नांदेड मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार तथा काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उमेदवारी कायम आहे. मात्र, हिंगोलीत खासदार अॅड. राजीव सातव गुजरातच्या जबाबदारीमुळे यंदा निवडणूक रिंगणाबाहेर आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत सातव यांनी पराभव केलेल्या शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना यंदा काॅँग्रेसने हिंगोलीतून तिकीट दिले आहे.  नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण यंदा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नव्हते. परंतु, शनिवारी (ता. २३) रात्री श्री. चव्हाण यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली. त्याआधी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडून निवडून आलेले लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीतर्फे यशपाल भिंगे हे निवडणूक लढवत आहेत. परंतु श्री. चव्हाण आणि श्री. चिखलीकर यांच्यात थेट चुरशीची लढत होईल असे मानले जात आहे.

चिखलीकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना काॅँग्रेस -राष्ट्रवादी काॅँग्रेस आघाडीमध्ये सहभागी आहे. परंतु, ऊस एफआरपी प्रश्नी काॅँग्रेस-राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या आधिपत्याखालील तसेच अन्य साखर कारखानदारांविरुद्ध न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढावी, अशी भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी घेतली आहे. या परिस्थितीत चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात चुरशीची लढत होईल. अशोक चव्हाण यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अॅड. राजीव सातव यांनी अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे सुभाष वानखडे यांचा १ हजार ६०० मतांनी पराभव केला होता. गुजरातची जबाबदारी तसेच गटबाजीला कंटाळल्यामुळे सातव यंदा निवडणूक रिंगणाबाहेर आहेत. मागच्या पराभवानंतर वानखेडे भाजपत डेरेदाखल झाले होते. शिवसेनेतर्फे नांदेड (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

परंतु, मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. सुभाष वानखेडे यांनीही हेमंत पाटील यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काॅँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी (ता. २४) सुभाष वानखेडे यांना हिंगोलीतून उमेदवारी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीतर्फे मोहन राठोड हे उमेदवार आहेत. परंतु, शिवसेनेचे पाटील आणि काॅँग्रेसचे वानखडे यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. युतीने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे काॅँग्रेसपुढे प्रतिष्ठेच्या असलेल्या नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जागा कायम ठेवण्याचे आव्हान आहे.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...