agriculture news in marathi, lok sabha election nomination form status, nagar, maharashtra | Agrowon

नगर मतदारसंघात सहा उमेदवारांचे अर्ज बाद

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 एप्रिल 2019

नगर  : नगर लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता या मतदारसंघात अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

नगर  : नगर लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता या मतदारसंघात अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

नगर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ३१ इच्छुक उमेदवारांचे ३८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या कक्षात छाननीप्रक्रिया पार पडली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे या वेळी उपस्थित होते. कोणाही उमेदवाराने एकमेकांच्या अर्जावर आक्षेप नोंदविले नाहीत.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी व धनश्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यापैकी डॉ. विखे यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला, तर धनश्री विखे यांचा अर्ज अवैध ठरविला. पोपट दरेकर यांच्या अर्जावर दहा सूचकांच्या सह्या नसल्याने तो बाद ठरविण्यात आला. याच धर्तीवर जाकिर शेख यांचाही अर्ज अवैध ठरविला गेला.

भागवत गायकवाड यांनी नगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र त्यांच्यासाठी स्वाक्षरी केलेले सर्व सूचक शिर्डी मतदारसंघातील रहिवासी असल्याने, गायकवाड यांचा अर्ज अवैध ठरविला गेला. विलास लाकूडझोडे यांनी उमेदवारी अर्जासाठी आवश्‍यक असलेली अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. सुदर्शन शितोळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे भरलेला अर्ज शपथपत्र अपूर्ण असल्याने अवैध ठरविण्यात आला, तर अपक्ष म्हणून दाखल केलेला दुसरा अर्ज वैध ठरला.

यामुळे नगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३१ व्यक्तींपैकी पाच व्यक्ती अर्ज अवैध ठरल्याने निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. ८) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.


इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...