नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी, छोटे व्यापारी उद्‌ध्वस्त : पृथ्वीराज चव्हाण

उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी, धर्मवादी विचार धारेविरुद्ध व संविधान जपणूक करणारी ही निवडणूक आहे. २०१४ ला झालेली चूक सुधारण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी, छोटे व्यापारी, हातावर पोट असणारे उद्‌ध्वस्त झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

राष्ट्रवादी काॅँग्रेस आणि काॅँगेस आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या वतीने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, शिवाजीराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, सारंग पाटील, सत्यजीत पाटणकर आदींची उपस्थिती होती. 

यावेळी अजित पवार म्हणाले, की सव्वाशे कोटी जनतेच्या पंतप्रधानांनी पवारांचे खानदान काढले. पवारांचे खानदान आणि देशाचे राजकारणाचा काय संबंध आहे. पंतप्रधान तुम्ही काळजी करू नका, पवार कालपर्यंत एक होते, आजही एक आहेत आणि मरेपर्यंत एकत्र राहितील. प्रश्‍न बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचा होता. पाच वर्षांत तुम्ही सत्तेत आल्यावर काय केले ते सांगण्यापेक्षा नको त्याबद्दल वक्तव्य करत आहेत. 

उदयनराजे भोसले म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी तुम्ही बहुमत दिले, पण काय झाले. अभिनय करून मते मिळवली, आश्वासने देऊन मते घेतली. बहुमत मिळाल्यावर तळागाळातील लोकांचा विसर पडला. १५ लाख खात्यात जमा करणे सोडा, नोटा बंदी करून पैसे काढून घेतले. पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या. देशात हुकूमशाही आहे. एक माणूस देशापेक्षा मोठा कसा होतो. पाच वर्षांपूर्वी तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. सत्तांतर होत नाही तोपर्यंत गत्यंतर नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com