agriculture news in marathi, lok sabha election, shirdi, maharashtra | Agrowon

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार रिंगणात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात मोठा प्रभाव असलेले विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.

नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात मोठा प्रभाव असलेले विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान पार पडले. जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होत आहे. या मतदारसंघात सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काॅँग्रेस), बन्सी सातपुते (भाकप), सुरेश जगधने (बसप), अशोक जाधव (राष्ट्रीय मराठा पक्ष), प्रकाश आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष), विजय घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय सुखदान (वंचित बहुजन आघाडी), गोविंद अमोलिक (अपक्ष), अशोक वाकचौरे (अपक्ष), किशोर रोकडे (अपक्ष), गणपत मोरे (अपक्ष), प्रदीप सरोदे (अपक्ष), बापू रणधीर (अपक्ष), शंकर बोरगे (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष), सचिन गवांदे (अपक्ष), सुभाष त्रिभुवन (अपक्ष), संपत समिंदर (अपक्ष) असे वीस उमेदवार रिंगणात आहेत. 

येथे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काॅँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह भाजपतून बंडखोरी केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष लढत आहेत. वाकचौरे यांनी चांगला जोर लावला असल्याने तिंरगी लढत होण्याची शक्यता आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव दक्षिण नगरमधून भाजपकडून निवडणूक लढत आहेत. विखे यांनीही सुजय यांच्यासाठी भाजपला मते मिळावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. विखे यांचा शिर्डी मतदारसंघात मोठा प्रभाव असून त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...