agriculture news in marathi, lok sabha election voting status, pune, maharashtra | Agrowon

बारामतीत शांततेत मतदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत  बारामती मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले. उन्हाचा चटका असतानाही मतदार रांगा लावून मतदान करत असल्याचे दिसून आले, बॅटरी संपल्याने र्इव्हीएम बदलाव्या लागण्याची एखादं दुसरी घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.  

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत  बारामती मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले. उन्हाचा चटका असतानाही मतदार रांगा लावून मतदान करत असल्याचे दिसून आले, बॅटरी संपल्याने र्इव्हीएम बदलाव्या लागण्याची एखादं दुसरी घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.  

सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर मतदानासाठी गर्दी झाली होती. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होममध्ये, कांचन कुल यांनी दौंड, नवनाथ पडळकर यांनी बारामतीतील तांदुळवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर उन्हाच्या तीव्रतेने मतदानावर काहीसा परिणाम झाल्याचे चित्र दिसले. मात्र, दुपारी तीन नंतर पुन्हा मतदानाने वेग घेतला होता. यंदा व्हीलचेअरच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची सोय झाली.  

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी मिळालेल्या युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येत आहे. मतदाराला आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर तत्काळ ‘व्हीव्हीपॅट मशिन’च्या स्क्रीनवर संबंधित उमेदवाराचा क्रमांक, नाव व निशाणी दिसत असल्याने आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला मिळाले याची खात्री होत असल्याने जुन्या मतदारांसह नवीन मतदारांमध्ये कमालीची उत्‍सुकता पहावयास मिळाली. 
विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाचपर्यंत) : दौंड - ५२.०१, इंदापूर-५१.२०,बारामती-६२.८०, पुरंदर-५२.७०, भोर-४८.४४, खडकवासला-४६.८७.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...