पुण्यात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
पुण्यात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.२३) मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित सरासरी ५३ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. शहरामधील विविध पेठांमध्ये सकाळी मतदानाचा उत्साह होता. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये मतदानाचा उत्साह कमी होता. तर दुपारी उन्हामुळे मतदानाचा उत्साह कमी झाला होता. संध्याकाळी ४ नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. 

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काॅँग्रेस अशी प्रमुख लढत असून, भाजपकडून अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट, तर काॅँग्रेसकडून मोहन जोशी निवडणूक रिंगणात आहे. बापट यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठेतील अहिल्यादेवी प्रशालेत कुटंंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. जोशी यांनी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सॅलिसबरी पार्क येथील ह्युम मॅकेनगरी शाळेत कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

विविध मतदान केंद्रांवर मशिनचा वेग कमी असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मशिनच्या वेगामुळे मतदान प्रक्रियेच्या विलंबामुळे मतदारांना रांगेमध्ये तिष्ठत राहावे लागत असल्याचे चित्र विविध मतदान केंद्रावर होते. शहरातील प्रमुख पेठांमध्ये सकाळी मतदानांचा उत्साह चांगला होता. मात्र, उपनगरांमध्ये हा उत्साह तुलनेने कमी होता. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र विविध मतदान केंद्रांच्या बाहेर दिसत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com