agriculture news in marathi, lok sabha election voting,satara,maharashtra | Page 3 ||| Agrowon

साताऱ्यात उत्साहात मतदान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

सातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते. 

सातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते. 

लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी सुवासिनींच्या हस्ते प्रथम मतदान करण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविकांनी मतदान केंद्रात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. पाण्याची व्यवस्थाही केली होती. त्या दिव्यांग मतदारांना मदतही करीत होत्या. गेले काही दिवस उन्हाचा कडाका जास्तच वाढला आहे. पूर्व भागातील खटाव-माण तालुक्‍यात त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे अनेक महिलांसह नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊपर्यंत त्यामुळेच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. 

दुपारच्या सत्रात उन्हामुळे मतदार बाहेर पडले नाहीत, दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात पाच लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदारांचा खोळंबा झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडीत येथील केंद्रावरील अर्धा तास तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद पडले होते.

गोवारे (ता. कराड) येथील सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास मतदान केंद्र क्रमांक ९८ मधील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदार खोळंबले होते. नवीन मशिन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे मतदान केंद्र क्रमांक २८२  येथे व्हीव्हीपॅट बंद अर्ध्या तास बंद पडले होते. वाईहून तंत्रज्ञ आल्यानंतर दुरुस्ती झाली.

वाई तालुक्यातील वेळे येथे तीन वाजण्याच्या सुमारास मतदानावर बहिष्काराचे सावट असतानाच १३७ नंबर केंद्रातील मशिन सुमारे एक तासभर बंद पडले होते. महामुलकरवाडी (ता. जावली) येथे दुपारी तीन वाजता मतदान मशिन बिघडल्यामुळे  मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. 
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)  ः वाई ५१.११, कोरेगाव ५४.३१, कऱ्हाड उत्तर ५६.४९, कऱ्हाड दक्षिण ५६.२२, पाटण ५०.३०, सातारा ५०.३६.


इतर ताज्या घडामोडी
अपात्र कांदाचाळी तपासणीनंतर पात्रनगर  : सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कृषी...
कृषी स्वावलंबन योजना स्थगितअकोला : मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी...
सोलापूर जिल्ह्यात पहिली उचल २५०० रुपये...सोलापूर :‘‘जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी...
कांद्यावर फुलकिडे,करपा रोगाचा... सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीची मदत ५०...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...