चौसष्ठ योगिनींचे मंदिर ठरतेय नेत्यांचा आकर्षणबिंदू

चौसष्ठ योगिनींचे मंदिर ठरतेय नेत्यांचा आकर्षणबिंदू
चौसष्ठ योगिनींचे मंदिर ठरतेय नेत्यांचा आकर्षणबिंदू

मुरैना : मध्य प्रदेशातील भिंड मुरैना भागात चंबळचे खोरे डाकूंसाठी कुख्यात असली, तरीसुद्धा याच भागात चक्क संसद भवनाची प्रतिकृती पाहायला मिळते. चौसष्ट योगिनींचे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेली ही वास्तू प्रत्यक्षात महादेवाचे मंदिर आहे. हुबेहूब संसदेसारखी दिसणारी ही वास्तू संशोधकांच्याही आश्‍चर्याचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या रणभूमीमध्ये उतरलेला उमेदवार आवर्जून या मंदिरात दर्शनासाठी येत असतो. मुरैनाचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतीच या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराबाबत भाष्य करताना तोमर म्हणाले, "युनेस्को'च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये या वास्तूचाही समावेश व्हावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. पुरातत्त्व विभागाचे भोपाळ आणि दिल्ली विभागाचे तत्कालीन प्रमुख के. के. महंमद या देखेरेखीखाली २००५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता, पण त्यांच्या निवृत्तीपर्यंत ते याचे काम पूर्ण करू शकले नाहीत.''  मितावली आणि पढावली या दोन गावांमध्ये एक हजार वर्षे पुरातन वारसास्थळे असून, पूर्वी परकी आक्रमणांना सामोरे जाणाऱ्या या स्थळांनी नंतर चंबळ खोऱ्यातील कुख्यात गुंडांना आश्रय दिला. आता या वास्तूसमोर बेकायदा उत्खननाचे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. संसदेचा आराखडा इसवीसन १३२३ मध्ये राजा देवपालने तांत्रिक साधनेचे शिक्षण घेता यावे म्हणून हे चौसष्ट योगिनींचे मंदिर उभारले, तेव्हा कुणीही कल्पनाही केली नसेल की विसाव्या शतकामध्ये ब्रिटिश वास्तुरचनाकार एडवर्ड ल्युटन्स याच मंदिराच्या धर्तीवर भारतीय संसद भवनाची प्रतिकृती साकारतील. संसद भवनाचा मूळ आराखडा याच मंदिराची वास्तुरचना पाहून तयार करण्यात आला असल्याचा दावा संशोधक महंमद करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com