शेती क्षेत्राचा हवा स्वतंत्र अर्थसंकल्प : अंकूश पडवळे

शेती क्षेत्राचा हवा स्वतंत्र अर्थसंकल्प : अंकूश पडवळे
शेती क्षेत्राचा हवा स्वतंत्र अर्थसंकल्प : अंकूश पडवळे

सध्या शेती आणि शेतकरी आर्थिक संकटातून जात आहे. यासाठी वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेती क्षेत्रातील दूरदृष्टी असलेल्या नेत्याला कृषिमंत्री, वाणिज्यमंत्री, अन्नमंत्री यासारखी महत्त्वाची पदे द्यायला हवीत, या अशा अभ्यासू मंडळीशिवाय शेती क्षेत्राच्या विकासाला योग्य दिशा आणि गती मिळणार नाही. देशातील जवळपास ६० टक्‍क्‍यांहून अधिक क्षेत्र शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर आधारित पूरक आणि प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे, त्यासाठी स्वतंत्र धोरणे, आराखडा आखायला पाहिजे. मुख्यतः शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, तरच बऱ्यापैकी प्रश्‍न सुटतील. शेतीमध्ये कोरडवाहू शेतकरी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरडवाहू भागातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेणे व त्याचा वापर काटेकोर करण्यासाठी सूक्ष्मसिंचनाची सक्ती करणे आवश्‍यक आहे. सिंचनाच्या सध्याच्या प्रकल्प क्षेत्रात पाण्याचा वापर काटकसरीने आणि सूक्ष्मसिंचनाने केल्यास किमान चारपट सिंचनक्षेत्र वाढेल. त्यासाठी ठिबक संचाची सक्ती आवश्‍यक आहे. आगामी सरकारने त्याबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. शेतीमालाला भाव हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे. कृषी निर्यात धोरणात बदल केले पाहिजेत. खेडी ओस पडत असल्याचे चित्र आहे. १४ वा १५ व्या वित्त आयोगाचा निधी समाज मंदिर, सभामंडप यांसारख्या बाबींवर बहुतांश खर्च होतो; पण त्याऐवजी शेती, शिक्षण, आरोग्य, पाणी यांसारख्या बाबींवर प्राधान्याने खर्च होणे गरजेचे आहे. त्यासाठी मानसिकता बदलणे आणि आपल्या गरजांनुसार काम होणे आवश्‍यक आहे. -  अंकुश पडवळे, अध्यक्ष, महाऑरगॅनिक ॲँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com