agriculture news in marathi, Loksabha election, Sanjay Jadhav to contest for fourth time | Agrowon

संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मार्च 2019

अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने अापला उमेदवार जाहीर करीत अाघाडी घेतली. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना पक्षाने अकोल्यातून चौथ्यांदा उमेदवारी दिली अाहे. श्री. धोत्रे हे सोमवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करणार अाहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. सोबतच बहुजन वंचित अाघाडीनेही अापले पत्ते उघडे केलेले नाहीत.

अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने अापला उमेदवार जाहीर करीत अाघाडी घेतली. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना पक्षाने अकोल्यातून चौथ्यांदा उमेदवारी दिली अाहे. श्री. धोत्रे हे सोमवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करणार अाहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. सोबतच बहुजन वंचित अाघाडीनेही अापले पत्ते उघडे केलेले नाहीत.

अकोला लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला झालेला अाहे. खासदार धोत्रे यांनी मागील निवडणुकांमध्ये विरोधकांना एकतर्फी हरविले. या विजयात त्यांना मतदारांनी भरभरून देण्याची तत्कालीक वेगवेगळी कारणे होती. गेल्या वेळी तर ते मोदी यांच्या लाटेने तरले. या वेळी परिस्थिती तितकी सोपी राहलेली नाही. जातीय व इतर सर्व समीकरणे जुळून अाली तर काँग्रेस-अाघाडी किंवा बहुजन वंचित अाघाडीसुद्धा स्पधेत मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धोत्रे यांच्याबाबत वाशीम जिल्ह्यातील रिसोड या विधानसभा मतदारसंघात मोठी नाराजी अाहे. या मतदारसंघातील नागरिकांनी गेल्या १५ वर्षांत खासदार या भागात फारसे फिरकले नसल्याचे सांगितले. तसेच विकासकामांचीही बोंबाबोंब असल्याचा सूर सुरू केला अाहे. अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातही ग्रामीण भागात फारसे उत्साही वातावरण नाही. विद्यमान खासदारांना गेल्या वेळप्रमाणे यंदा तितके पोषक वातावरण नाही.
 खरी डोकेदुखी बहुजन वंचित अाघाडीची ठरू शकते. ॲड. प्रकाश आंबेडकरांचे होमटाऊन असलेल्या या मतदार संघात ते अठरापगड जातींची मोट बांधून रिंगणात येण्याची तयारी करीत अाहेत. तसेच काँग्रेसही नवीन चेहरा शोधत अाहे.

काँग्रेसअाघाडी, वंचित अाघाडीचे उमेदवार योग्य पद्धतीने रिंगणात उतरविण्यात अाले तर चित्र बदलू शकते, अशी परिस्थिती अाहे. यामुळेच भाजपचा उमेदवार जाहीर होईपर्यंत विविध प्रकारच्या वावटळी उठल्या होत्या. उमेदवार बदलला जाईल, अशी शक्यताही बोलली जात होती. मात्र पक्षाने शेवटच्या क्षणी खासदार धोत्रे यांचे नाव यादीत जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला. अाता खरी लढत येत्या १८ एप्रिलला होणार अाहे. शेतीप्रश्नांवर शेतकऱ्यांची दोन्ही शासनांप्रती मोठी नाराजी अाहे. त्यामुळे धोत्रे यांचा अधिक कल शहरी, मध्यमवर्गीय मतदारांवर राहण्याची शक्यता अाहे.

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...