लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच करणार : किसान सभा

नरेंद्र मोदींनी ४०० पेक्षा जास्त सभांमध्ये अच्छे दिन येण्याचा वायदा केला होता. परंतु परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडली आहे. म्हणूनच मागण्यासाठी या गद्दार सरकारच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आमची मागणी आहे, की पुढील निवडणुका या मंदिर मशिद किंवा जाती- धर्माच्या आधारे नको तर शेतकरी आणि कष्टकरी हिसासाठी हव्यात. - मा. खा. हनन मौला,जनरल सेक्रेटरी, किसन सभा
लाॅंग मार्च
लाॅंग मार्च

नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्या आश्वासन देऊन पूर्ण न केल्याने किसान सभेने पुन्हा एकदा मुंबईवर धडक देण्यासाठी कूच केली. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकरी, आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत. परंतु, मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चेकऱ्यांनी आंदोलन करावे, मोर्चा काढू नये असे सांगण्यात आले. 

दरम्यान, गुरुवारी (आज, ता.२१) शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईकडे सकाळी कूच करेल, अशी माहिती सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी, आदिवासी बांधव व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. किसान सभेचे जनरल सेक्रेटरी माजी खासदार हनन मौला, आमदार जिवा पांडू गावित, डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, उदय नारकर यांच्यासह विविध पदाधिकारी मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकाच्या मैदानावर जमले होते. मागील वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकहून पायी मुंबई गाठली होती. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. परंतु वर्षभराच्या कालावधीत यातील काही मागण्यांवर कार्यवाही झालेली नाही. आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर अद्याप वनजमिनी झालेल्या नाहीत. वृद्ध शेतकऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू झालेली नाही. शिधापत्रिकेवर अन्न-धान्य मिळत नाही. घरकुल योजनेची अंमलबजावणी झालेली नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेस वाळवावे या मागण्या आहेत. सायंकाळी ४ वा मोर्चा नियोजित वेळेत मुंबईकडे मार्गस्थ होणार होता. मात्र काही ठिकाणी पोलिसांनी आदिवासी बांधवांना व शेतकऱ्यांना अडविल्याचे आ. जिवा पांडू गावित यांनी सांगितले.   या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मागण्यांसाठी किसान सभेला मुंबई नाका येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, महामार्गाने मोर्चा काढू दिला जाणार नाही, यावर पोलिस प्रशासनाने ठाम भूमिका घेतली. सायंकाळपर्यंत हा मोर्चा मार्गस्थ झालेला नव्हता. पोलिसांच्या दबावात मोर्चा मुंबईकडे जातो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिक्रिया पोलिस प्रशासनाने काही ठिकाणी आमच्या शेतकरी व आदिवासी बांधवाना अडविले असले व परवानगी नाकारली असली तरी आम्ही जाणार आहोत. आमच्यावर काठ्या जरी पडल्या तरी आम्ही तयार आहोत. आम्ही मुंबई गाठू व सरकारला जाब विचारू. - जिवा पांडू गावित, आमदार, कळवण-सुरगाणा

Video..  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com