agriculture news in marathi, Long-Term Measures for Water : Sunil Kendrekar | Agrowon

पाण्यासाठी दीर्घकालीन उपायोजना करा : सुनील केंद्रेकर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 जून 2019

हिंगोली : ‘‘पाणी टंचाईग्रस्त गावात भूवैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. टंचाईग्रस्त गावांना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन परिस्थितीची माहिती घ्यावी. टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात. यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत,’’ असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

हिंगोली : ‘‘पाणी टंचाईग्रस्त गावात भूवैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. टंचाईग्रस्त गावांना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन परिस्थितीची माहिती घ्यावी. टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात. यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत,’’ असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात गुरुवारी (ता. ३०) टंचाई स्थिती उपायोजना आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, प्रवीण फुलारी, अतुल चोरमारे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

केंद्रेकर म्हणाले, ‘‘कृषी विभागाने खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूवैज्ञानिक अधिकारी व जलसिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांची समिती स्थापन करावी. त्याद्वारे पाणीपुरवठा वसुलीबरोबरच टंचाईग्रस्त गावांच्या स्थितींचा विचार करावा. त्यानुसार पाणी उपलब्धतेचे नियोजन करावे.’’

‘‘टंचाईच्या काळात लोकहिताची कामे करण्याची संधी प्रशासनाकडे आहे. या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करावे. पाणीपुरवठ्याची नवीन योजना सुचविताना जुन्या योजनेचा अभ्यास करून नवीन योजनांचा आराखडा तयार करावा,’’ असेही केंद्रेकर यांनी सांगितले.
 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...