agriculture news in marathi, longmarch in kerala on Sabarimala issue | Agrowon

शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये आज लाँग मार्च
उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या मागणीसाठी आज (ता. १५) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली सुमारे ८० हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लाँग मार्च काढण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई हे लाँग नेतृत्व करणार आहेत. 

तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या मागणीसाठी आज (ता. १५) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली सुमारे ८० हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लाँग मार्च काढण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई हे लाँग नेतृत्व करणार आहेत. 

   धार्मिक परंपरा आणि रुढी जपण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करावी, अशीही मागणी प्रदेश भाजपने केली आहे.
अय्यपा ब्रह्मचारी असून, दहा ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व वयोगटांतील महिलांना दर्शनासाठी परवानगी देणारा आदेश दिला आहे. या आदेशाविरुद्ध याचिका दाखल करण्यास केरळ सरकार आणि देवासम मंडळाने नकार दिला आहे. १८ ऑक्‍टोबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. तत्पूर्वी मंदिर १७ ऑक्‍टोबरला सायंकाळी सुरू होणार आहे. शबरीमला येथे दर्शनासाठी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई जाणार असून, स्थानिक शिवसेनेने मात्र आत्मघाती पथक रवाना करणार असल्याचे नमूद केले. केरळ सरकारने शबरीमला येथील महिलांच्या दर्शनासाठी तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्य पोलिसांना निर्देश दिले असून, मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

   दरम्यान, या आदेशाविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे. प्रारंभी भाजपने महिलांच्या मंदिरप्रवेशाची बाजू घेतली होती; परंतु भाविकांची नाराजी पाहता भाजपने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारचा लाँग मार्च पंडलम येथून सुरू होणार असून, तो सचिवालयापर्यंत जाणार आहे. हिंदू भाविकांच्या तीव्र भावना लक्षात घेता सीपीएमच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना तडजोडीची भूमिका घेण्याचे सागितले आहे. यासाठी उद्या (ता.१६) पंडलम येथील शाही कुटुंबीयासमवेत चर्चा होणार आहे. लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवीण तोगडिया येथे दाखल झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...