निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर नजर

निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर नजर
निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर नजर

नाशिक  : निवडणूक काळात आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात एक लाखापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, काढण्यासाठी बँकेकडे प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकरी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत मांढरे बोलत होते. निवडणूक काळात बँकांनी आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील साठविणे आवश्यक आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. 

निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम यंत्रात रोकड जमा करताना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा. खासगी विमान, हेलिकॉप्टरची सेवा पुरविताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. 

प्राप्तिकर विभागाने या प्रकरणी तात्काळ प्रतिसाद यंत्रणा निर्माण केली आहे. रोकड रकमेच्या वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांबाबत रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन सूचनांची कटाक्षाने  अंमलबजावणी करावी. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख, त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे, काढणे, उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढण्याची, जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्या संदर्भात प्राप्तिकर विभागाच्या   अधिकाऱ्यांना कळवावे, अशा सूचना मांढरे यांनी केल्या. 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, प्राप्तिकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, आयकर विभागाचे उपायुक्त मनोज सिन्हा, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी. व्ही. बर्वे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com