Agriculture news in marathi Look at the 'Pandurang, Vitthal' elections | Agrowon

‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे लक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि (कै.) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासोबतच सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची (दूध पंढरी) निवडणूकही सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पण, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदलेल्या समीकरणांमुळे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि (कै.) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासोबतच सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची (दूध पंढरी) निवडणूकही सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पण, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदलेल्या समीकरणांमुळे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त येत्या काळात जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली २१५ च्या निवडणुकीपासून ते आजतागायत जिल्हा दूध संघावर समविचारी नेत्यांची सत्ता कायम राहिली. २०१५ मध्ये झालेल्या संघाच्या निवडणुकीत महिला मतदारसंघातील दोन जागा वगळता उर्वरित १५ जागांवर संचालकांची निवड बिनविरोध झाली आहे. 

महिला मतदारसंघातील दोन्ही जागांवर विद्यमान सत्ताधाऱ्यांच्याच गटाला यश मिळाले आहे. परिचारक सध्या भाजपचे सहयोगी आमदार आहेत. परंतु, संघावरील अनेक संचालक हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यात अनेक राजकीय बदल झाले आहेत. त्यामुळे संघाच्या निवडणुकीत काय होणार, यासह परिचारक यांच्याच पांडुरंग साखर कारखान्याचीही निवडणूक होत आहे. 

आमदार बबनराव शिंदे अध्यक्ष असलेल्या शिंदे साखर कारखान्याचीही निवडणूक लवकरच होणार आहे. हे दोन्ही कारखाने या नेत्यांच्या ताब्यात फार पूर्वीपासून आहेत. त्यामुळे तिथे काही बदल होईल, असे नाही. पण, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मात्र चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. 

दूध संघ अडचणीत

दुष्काळ, जागतिक बाजारात दूध भुकटीचे कोसळलेले दर, खासगी दूध संघांच्या माध्यमातून दूध व्यवसायात असलेली स्पर्धा, शासनाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव, दूध संस्थांसह इतरांकडे असलेली थकबाकी, यामुळे जिल्हा दूध संघ आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्याच्या जवळपास अडीच हजार दूध उत्पादक संस्था सभासद आहेत. ९७ व्या घटना दुरुस्तीमुळे क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद अशा दोन प्रकारांत सभासदांचे वर्गीकरण केले जात आहे. क्रियाशील सभासदांची यादी निश्‍चित झाल्यानंतरच पुढील घडामोडींना वेग येईल.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...