Agriculture news in Marathi Loose lockdown in Bhandara district: MLA Phuke | Agrowon

भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करा ः आमदार फुके

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

भंडारा ः जिल्ह्यात सुदैवाने एकही ‘कोरोना’बाधीत आढळला नाही. त्यामुळे मंगळवार (ता. १४) पासून भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. 

भंडारा ः जिल्ह्यात सुदैवाने एकही ‘कोरोना’बाधीत आढळला नाही. त्यामुळे मंगळवार (ता. १४) पासून भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या परिणामी संसर्गाला आळा घालण्यात बऱ्यापैकी यश येत आहे. तथापि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचा दर कमी होण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव सर्वाधिक प्रमाणात असला तरी समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्‍या जिल्ह्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला नाही. त्यातीलच एक जिल्हा म्हणजे भंडारा होय. लॉकडाऊनमुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. 

शेती व शेती संलग्न उद्योग करताना अडचणीत येत आहेत. शेतकरी, शेतमजूर व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनच्या संदर्भात शिथिलता अथवा विस्ताराबाबत निर्णय घेताना भंडारा जिल्ह्याच्या सीमा सुरक्षित करून जिल्हा अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी डॉ. फुके यांनी केली आहे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...