agriculture news in Marathi, Loot of farmers in Jalgaon onion sale | Agrowon

जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन व्यवस्था अडतदार, खरेदीदारांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक स्थितीत आणून ठेवली आहे. गोणीमागे शेतकऱ्यांना सुमारे ३९ रुपये खर्च अवाजवी लागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. 

जळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन व्यवस्था अडतदार, खरेदीदारांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक स्थितीत आणून ठेवली आहे. गोणीमागे शेतकऱ्यांना सुमारे ३९ रुपये खर्च अवाजवी लागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. 

या शेतकऱ्याने नुकताच १५० क्विंटल कांद्याची विक्री केली. दर्जेदार कांद्याला कवडीमोल दर बाजारात मिळाल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. शेतकरी म्हणाला, की मी कांद्याची विक्री जळगाव बाजार समितीत टप्प्याटप्प्याने केली. आवक कमी असली तरी २८० रुपये दर आणि आवक अधिक असली तर २५० रुपये दर दर्जेदार कांद्याला मिळाले. कांदा भरण्यासाठी बारदाना लागतो. त्यात तागाची गोणी २७ रुपयाला अडतदाराने दिली. ती ४० किलो क्षमतेची होती. प्लॅस्टिकच्या दोरीच्या गोण्या घेतल्या तर या गोणीमागे ३० रुपये खर्च लागेल, असे अडतदाराने सांगितले. यामुळे तागाची गोणी घ्यावी लागली. गोणी बाजारात आणण्यासाठी प्रति १० किलोमीटरसाठी २० रुपये प्रतिगोणी असा खर्च लागला. बाजार समितीत पहाटेच लिलाव झाले. त्यात प्रत्येक गोणीचे वजन केले नाही. अडतदारांच्या तोलाईदारांनी पहिल्या १५ गोण्यांची तोलाई केली. त्याचे सरासरी वजन काढून सर्व १०० गोण्यांचे वजन गृहीत धरले. गोण्या ट्रॅक्‍टरमधून उतरविणे आणि तोलाई यापोटी प्रतिगोणी पाच रुपये ८० पैसे खर्च लावला. दर २८० रुपये प्रतिगोणी मिळाला. यातून २० रुपये वाहतूक खर्च, पाच रुपये ८० पैसे तोलाई व इतर खर्च, कटती गोणीमागे एक किलो आणि तागाच्या गोणीसाठी २७ रुपये प्रतिगोणी, असा एका गोणीमागे सुमारे ५३ रुपये खर्च लागला. अर्थातच दर २३० रुपये प्रतिगोणी, असा मिळाला. 

कांदा अडतदार परवडू देत नसल्याची स्थिती आहे. या हंगामात आठवड्यातून दोन दिवसच एक हजार ते १३०० क्विंटल आवक असते. इतर चार दिवस आवक फक्त ५०० ते ८०० क्विंटल असते. असे असतानादेखील दरवाढ होत नसल्याने नुकसान होत आहे. कांद्याचे दर किमान १२ रुपये प्रतिकिलो जागेवर (सर्व खर्च वगळून) शेतकऱ्याला मिळाला तरच तो परवडतो, त्याला काहीसा नफा मिळतो. टंचाई अधिक आहे. यामुळे मोठे श्रम कांदा उत्पादनासाठी लागले आहेत, असेही संबंधित शेतकरी म्हणाला. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...