Agriculture news in Marathi Looting of farmers from the wind | Page 2 ||| Agrowon

वाराईतून शेतकऱ्यांची लूट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

शेतकऱ्यांची होणारी लुट रोखण्यासाठी वाराई ही वजनानुसार आकारणी करावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशानाकडे केली आहे.

पुणे ः बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या शेतीमालाची वाहनांमध्ये केवळ फाळक्यापर्यंत आणून देणे, शेतीमाल वाहनांमध्ये लावणे या कामासाठीच्या ‘वाराई’मधून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट वर्षानुवर्षे सुरू आहे. नियमानुसार वाराईचे दर ५० किलोला ३ रुपये ४५ पैसे तर ५० किलोच्या पुढील वजनाला ३ रुपये ८० पैसे असताना, मात्र प्रत्येक डागाला ५ ते १० रुपये अशी लूट सुरू असून, याद्वारे शेतकऱ्यांची होणारी लुट रोखण्यासाठी वाराई ही वजनानुसार आकारणी करावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशानाकडे केली आहे.

बाजार समितीत शेतीमालाची आवक झाल्यावर हमाली, तोलाई, वाराई आदी विविध कामांसाठी नियमानुसार दर ठरविले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाराईची आकारणी ही वजनानुसार न होता, शेतीमालाच्या डागानुसार होत आहे. याचे मनमानी दर असून, हे दर ५ ते १० रुपये असल्याचे अडते असोसिएशनकडून सांगण्यात आले. ही आकारणी वजनानुसार करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली विविध घटकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व घटकांनी मते जाणून घेत, राज्यातील विविध बाजार समित्यांमधील वाराईचे दर आणि कार्यपद्धतींचा अवलंब कसा होतो. याची माहिती घेऊन, पुढील बैठक घेतली जाईल आणि त्यावर निर्णय होईल, असे बैठकीत ठरल्याचे समजते.

गेल्या २५ -३० वर्षांपासून वाराईची वसुली ही डागानुसार होत आहे. मात्र आता अडते असोसिएशन या पद्धतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचलित पद्धतच सुरू ठेवावी.
- संतोष नांगरे, सरचिटणीस, कामगार संघटना पुणे बाजार समिती

वाराईच्या दराबाबत गेली अनेक वर्षे सुधारणा झालेली नाही. अडते असोसिएशनचे म्हणणे आणि कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. नियमानुसारचे दर आणि सध्या घेतली जाणारी वाराई याबाबत चौथी पावती करण्याबाबत माथाडी बोर्डाला पत्र देणार आहोत. चौथ्या पावतीनुसार किती दर आकारला जातो हे निश्‍चित होईल. यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे बाजार समिती


इतर बातम्या
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...