दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
शासकीय खरेदीअभावी उत्पादकांची लूट
आज ना उद्या शासन कापूस खरेदी संकलन चालू करेल, या आशेवर अद्याप घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचा आता धीर सुटत चालला आहे. खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत
आरेगाव, जि. यवतमाळ : आज ना उद्या शासन कापूस खरेदी संकलन चालू करेल, या आशेवर अद्याप घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचा आता धीर सुटत चालला आहे. सणासाठी कशीबशी तजविज करून सण तर साजरा केला. परंतु आता पैसा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यंदा पुसद तालुक्यात सुमारे २५ ते २८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तर ३ हजार ८४४ शेतकऱ्यांनी कापूस विक्री करिता बाजार समितीत नोंद केली आहे. मागील वर्षी पुसद तालुक्यात १ लाख ३५ हजार क्विंटलची खरेदी जून महिन्याअखेर पर्यंत करण्यात आली होती. शेवटच्या टप्यात खरेदी केंद्रही वाढवण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे कुशल कामगारा अभावी जिनिंग करण्यास असमर्थता दाखविल्याने वाढीव खरेदी केंद्राचा कोणताच फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.
दरवर्षी दसरा मुहूर्तावर खरेदीचे नारळ फोडले जाते. परंतु यंदा दिवाळी होऊनही तालुक्यात एकही खरेदी केंद्र चालू करण्यात आले नाही. अगोदरच परतीच्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. तर आता रोगानेही कापूस पिकाला ग्रासले असून, उत्पादनात घट झाली आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे मजुरीत वाढ होऊन आठ ते दहा रुपये किलो प्रतिकिलो दराने मजुरी लागत आहे. केवळ पहिला वेचा समाधानकारक घरी आल्याने शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल, या आशेवर कापूस घरात ठेवला आहे. पण भावात वाढ होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी शासकीय खरेदी संकलन केंद्र चालू होण्याची वाट पाहत आहेत.
शासनाने पुसद तालुक्याचे व्यापक क्षेत्र पाहता खरेदी केंद्राची संख्या वाढवून लवकरात लवकर शासकीय कापूस खरेदी सुरू करावी, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.
- 1 of 1023
- ››